लेण्याद्री : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतक:यांच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, असा आदेश होता. सद्यस्थितीत राज्यात हजारो शेतक:यांनी आत्महत्या केल्या तरी राज्यकत्र्याच्या पापण्या ओल्या होत नाहीत, अशी टीका करतानाच उसाला 35क्क् रुपये उचल घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ  पाटील यांनी दिला.
किल्ले शिवनेरी ते साखर आयुक्त कार्यालय पुणो ऊसदर हक्क संघर्षयात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागप्रमुख कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, पांडुरंग रायते, तान्हाजी बेनके, लक्ष्मण शिंदे, संभाजी पोखरकर, अजित वाघ, संजय भुजबळ, डॉ. दत्ता खोमणो, अजित वालझडे यांच्यासह विविध पदाधिकारी शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते. 
किल्ले शिवनेरीवर शिवाईमातेस अभिषेक करून संघर्षयात्रेस प्रारंभ करण्यात आला. आयात मालाच्या विरोधात शेतक:यांवर आत्महत्या करण्याची वेळ सरकारने आणली आहे. बाबू गेणू यांनी परदेशी कपडय़ाच्या विरोधात बलिदान केले. त्याचप्रमाणो पामतेल, साखर, कांदा यांच्या आयातीविरोधात शेतक:यांना बलिदान करावे लागेल, असा इशारा देत बाबू गेणू यांच्या स्मृतिदिनी साखर आयुक्त कार्यालयावर संघर्षयात्रेचा समारोप होणार असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)
 
राजू शेट्टी भाजपाबरोबरच गेले आहेत. मंत्रिपदाच्या अभिलाषेपोटी ऊसदर आंदोलनाच्या तारखा ते पुढे ढकलत आहेत, असे सांगत त्यांचा सूर्याजी पिसाळ असा उल्लेख केला.
 
शेतक:यांच्या वीजबिले व मोबाईलच्या बिलासंदर्भात केलेल्या टिपणीसंदर्भात बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले, की खडसे यांना 15 दिवसांच्या अधांतरी सत्तेचा माज चढला आहे. 
 
 साखरेचा सण आहे; पण दराचा पत्ता नाही. उत्पादनखर्च भरून देणो सरकारचे काम आहे. उत्पादनखर्च अधिक 5क् टक्के नफा देण्याचे मोदी सरकारचे धोरण; पण उत्पादनखर्च नाही व काहीच नाही.