Ganesh Visarjan 2018 : पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 11:35 AM2018-09-23T11:35:32+5:302018-09-23T13:54:22+5:30

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून मानाच्या पहिल्या कसबा व मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतींचे मंडई येथून प्रस्थान झाले आहे.

Ganesh Visarjan 2018 miravnuk in pune | Ganesh Visarjan 2018 : पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Ganesh Visarjan 2018 : पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Next

Ganesh Visarjan 2018 miravnuk in pune

पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून मानाच्या पहिल्या कसबा व मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतींचे मंडई येथून प्रस्थान झाले आहे. ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. 

सकाळी मानाचा पहिला कसबा गणपतीची 10.15 च्या सुमारास मंडई येथे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आरती करण्यात आली. 10.30 वाजता कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. विसर्जन मिरवणुकीला पुणेकरांनी मोठी गर्दी केली असून लक्ष्मी रस्त्यावर नागरिक गणरायाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा लवकर विसर्जन मिरवणूक संपवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मानाच्या मंडळांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. तसेच डीजेलाही बंदी असल्याने यंदाची मिरवणूक लवकर संपण्याची शक्यता आहे.

दरम्यान दोनशेहून अधिक गणपती मंडळांनी डीजे बंदीच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांच्या मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.
 

Web Title: Ganesh Visarjan 2018 miravnuk in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.