तब्बल १० हजार पाणीपुरींचा १० फुटी गणेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 07:24 PM2018-09-14T19:24:42+5:302018-09-14T19:25:20+5:30

शाडू माती, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, कागदाच्या लगद्यापासून आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती साकारली जाते. मात्र या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असणाऱ्या पाणीपुरींच्या पुऱ्यांपासून गणराय साकारण्यात आले आहेत.

Ganesh 10 feet made by 10 thousand pani puri | तब्बल १० हजार पाणीपुरींचा १० फुटी गणेश

तब्बल १० हजार पाणीपुरींचा १० फुटी गणेश

googlenewsNext
ठळक मुद्देतब्बल १० हजार पुऱ्या, अमेरिकन शेवपुरी आणि १०० द्रोण वापरुन १० फूटी गणेश

पुणे : शाडू माती, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, कागदाच्या लगद्यापासून आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती साकारली जाते. मात्र या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असणाऱ्या पाणीपुरींच्या पुऱ्यांपासून गणराय साकारण्यात आले आहेत. तब्बल १० हजार पुऱ्या, अमेरिकन शेवपुरी आणि १०० द्रोण वापरुन १० फूटी गणेश साकारण्यात आले आहेत. या आगळ्यावेगळ्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पाणीपुरीचे चाहते आणि गणेशाचे भक्त गर्दी करीत आहेत.
एरंडवण्यामधील गणेश भेळतर्फे यंदा पाणीपुरींचा गणपती बाप्पा साकारण्यात आला आहे. प्रशांत साळुंके यांनी कारागिरांसह १५ दिवसांत हा बाप्पा साकारला आहे. यामध्ये गणपती बाप्पा स्वत: भेळ करुन ग्राहकांना देत आहे, अशी मूर्तीची संकल्पना आहे. यापूर्वी  २०१३ मध्ये देखील ३५०० पुऱ्यांचे बाप्पा साकारण्यात आला असल्याचे दिनेश आणि रुपेश गुडमेवार यांनी सांगितले. 

Web Title: Ganesh 10 feet made by 10 thousand pani puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.