बडोद्यातील संंमेलन रंगणार गायकवाड विद्यापीठात

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 3:28am

गुजरातमधील बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात हे संमेलन रंगणार आहे.

पुणे - गुजरातमधील बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात हे संमेलन रंगणार आहे. बडोदानगरीत १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. मात्र, या संमेलनाचे स्थळ जाहीर करण्यात आले नव्हते. संमेलन शहरात नेमके कोठे होणार, याची बडोदावासीयांसह तमाम मराठी साहित्यरसिकांना उत्सुकता होती. नुकत्याच मराठी वाङ्मय परिषदेच्या झालेल्या बैठकीत संमेलनस्थळ निश्चित करण्यात आले. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बडोद्यातील गायकवाड विद्यापीठात शिकण्यासाठी येणाºया बहुभाषिक विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे मत सिनेट सदस्यांनी मांडले होते. त्यावर सविस्तरपणे सकारात्मक चर्चाही झाली. मात्र, संमेलनस्थळाची घोषणा करण्यापूर्वीच राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली. आचारसंहिता लागू झाल्याने व विषय समितीसमोर मांडण्यात आलेल्या ठरावाला अंतिम मंजुरी मिळणे बाकी असल्याने संमेलनस्थळाची घोषणा आयोजकांना करता आली नसल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, कार्यवाहक वनिता ठाकूर आणि आशिष जोशी यांनी दिली. दरम्यान, सिनेट समितीची २९ डिसेंबरला बैठक झाली. त्यात विद्यापीठात संमेलन आयोजिण्याबाबत सर्वसंमतीने ठराव मंजूर करण्यात आला. विद्यापीठात संमेलन आयोजिल्याने या कार्यक्रमावरील जवळपास ६० टक्के खर्च वाचू शकणार आहे. याशिवाय विद्यापीठ मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शहरातील मराठीसह गुजराती भाषिकांनाही सहज पोहोचणे शक्य असल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख संजय बच्छाव यांनी दिली. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विषय समितीची १८ आॅक्टोबरला रोजी बैठक झाली होती. यात विद्यापीठाच्या सिनेट समितीच्या सदस्यांसह १८ जणांचा सहभाग होता. मराठी साहित्य संमेलन विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजिण्यात यावे, असा प्रस्ताव विद्यापीठाच्याच सिनेट सदस्यांनी मांडला.

संबंधित

तोतया पीएसआयचे हस्ताक्षर मागविले, मुंबईत दोन विक्रीकर अधिका-यांसह सहा जणांना अटक
त्या 'एकमेव' साहेबांचा व्यंगचित्रकार ते हिंदुह्रदयसम्राट होण्यापर्यंतचा प्रवास
वसंतदादा बँक घोटाळ्यास ‘सहकार’चा खो, स्थगितीचा सपाटा, अंतिम टप्प्यात येऊ सुनावणी रेंगाळली  
बहिणीची माया, चार वर्षाच्या चिमुकलीने वाचविले भावाचे प्राण
कोल्हापुरचा टोल लढा हा विकृत भांडवलशाहीवरील विजय - विश्वभंर चौधरी

पुणे कडून आणखी

पुणे महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक
जाहिरातबाजीपेक्षा कृतीमधून लोकांचा बसेल विश्वास : गिरीष बापट, पंतप्रधान आवास योजना कक्ष सुरु
गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी आंदोलन : डॉ़ राजेंद्र सिंह; पुण्यात राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ कलावंतांना मानधन द्यावे : लीला गांधी : १६ एमएम चित्रपट महोत्सवाचा समारोप 
न्यायालयात कचराकुंड्या महिनाभरापासून धूळखात; शिवाजीनगर न्यायालयातील परिस्थिती

आणखी वाचा