वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 09:01 PM2019-04-19T21:01:20+5:302019-04-19T21:02:09+5:30

आर्थिक कारणावरुन त्रास देत असलेल्या मित्राच्या जाचाला कंटाळून अ‍ॅड. युवराज ननावरे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे़.

friend is arrested for advocates suicide case | वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक

वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक

Next

पुणे : आर्थिक कारणावरुन त्रास देत असलेल्या मित्राच्या जाचाला कंटाळून अ‍ॅड. युवराज ननावरे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे़. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी त्याच्या मित्राला अटक केली आहे़. 
अभय रामचंद्र कुलकर्णी (वय ४८, रा़ गुरुराज सोसायटी, पद्मावती) असे अटक केलेल्याचे नाव आहे़. याप्रकरणी युवराज ननावरे यांच्या पत्नीने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. अ‍ॅड. युवराज ननावरे यांनी १ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती़. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अ‍ॅड. युवराज ननावरे यांची जीपीएस ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटची कंपनी आहे़. त्यांनी २०१६ मध्ये अभय कुलकर्णी यांच्याकडून ६७ लाख रुपये व्याजाने घेतले होते़. त्याबदल्यात ननावरे यांनी व्याज म्हणून ५६ लाख रुपये परत केले होते़ असे असले तरी ननावरे यांनी अजून १ कोटी १० लाख रुपये द्यावेत अशी अभय कुलकर्णी यांनी केली व त्यासाठी त्याने ननावरे यांच्याकडे तगादा लावला होता़. फोनवरुन युवराज यांना शिवीगाळ करुन त्यांना त्रास दिला़. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून ननावरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़. 
याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अभय कुलकर्णी यांनी आपण उंड्री येथील १० एकर जमीन विकली होती़. त्यातून आलेले पैसे अ?ॅड़ ननावरे यांना दिल्याचे त्याचे म्हणणे आहे़. कुलकर्णी हा सध्या एलएलबी करीत असून ते पूर्ण झाल्यावर ननावरे यांच्याबरोबर कन्सल्टंन्सी फर्म काढणार होतो, असे कुलकर्णी याचे म्हणणे आहे़. कुलकर्णी याला न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़. 

Web Title: friend is arrested for advocates suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.