चोरीच्या चार बुलेटसह सव्वासहा लाखांच्या दुचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 08:11 PM2018-09-21T20:11:10+5:302018-09-21T20:11:27+5:30

बुुलेट चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने पाठलाग करून तिघांना कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमारेषेजवळ अटक केली.

Four bags of stolen four bags seized | चोरीच्या चार बुलेटसह सव्वासहा लाखांच्या दुचाकी जप्त

चोरीच्या चार बुलेटसह सव्वासहा लाखांच्या दुचाकी जप्त

Next
ठळक मुद्देविक्री केलेल्या दुचाकी पोलिसांनी ४ बुलेट तसेच सुझूकी ३ अशा दुचाकी जप्त

पुणे : बुुलेट चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने पाठलाग करून तिघांना कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमारेषेजवळ अटक केली. त्यांच्याकडून वाहन चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. ४ बुलेट आणि दोन सुझीकी एक्सीस अशा ६ लाख २५ हजार रुपयांचे ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. 
युनूस अमीर हमजा शेख (वय ५०, रा. सांगली), बसवराज बसलिंगअप्पा वन्नूर (वय ४९, रा. बेळगाव. रा. कर्नाटक) व हरेश उर्फ हनी विजयकुमार रामत्री (वय २४, रा. ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस जितेंद्र तुपे यांना माहिती मिळाली की, फरासखाना परिसरातून बुलेट चोरून दोघे पुणे-बेंगलोर महामार्गावर जात आहेत. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील तुपे, गणेश साळुंखे व सागर घोरपडे यांनी दोघांचा पाठलाग सुरू केला. मात्र, चोरटे कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमारेषेजवळ पोहचले होते. पथकाने दोघांचा १० ते १२ तास पाठलाग करून त्यांना बुलेटसह पकडले. युनूस शेख व बसवराज यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची बुलेट मिळाली. तपासात ही बुलेट हरेश उर्फ हनी याने चोरल्याचे सांगितले. त्यानुसार,त्याला अटक केली. तिघांकडून पोलिसांनी वाहन चोरीचे ६ गुन्हे उघडकीस आणत ६ लाख २५ हजारांच्या दुचाकी जप्त केल्या. आरोपी हरेश हा दुचाकी चोरत असे. तसेच, त्या विक्री करण्यासाठी युनूस व बसवराज यांच्याकडे देत असे. त्यानंतर हे दोघे या दुचाकी बेंगलोरमध्ये विक्री करत होते. तेथे विक्री केलेल्या दुचाकी पोलिसांनी ४ बुलेट तसेच सुझूकी ३ अशा दुचाकी जप्त केल्या आहेत. 

Web Title: Four bags of stolen four bags seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.