बँक आॅफ महाराष्ट्रच्या माजी अध्यक्षाला २७ जूनपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:38 PM2018-06-22T14:38:27+5:302018-06-22T14:38:27+5:30

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असणाऱ्या डीएसकेंच्या कंपनीला गैरमार्गाने कोट्यावधी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

The former president of Bank of Maharashtra will be in custody till June 27 | बँक आॅफ महाराष्ट्रच्या माजी अध्यक्षाला २७ जूनपर्यंत कोठडी

बँक आॅफ महाराष्ट्रच्या माजी अध्यक्षाला २७ जूनपर्यंत कोठडी

Next
ठळक मुद्देप्रवासी कोठडीद्वारे शुक्रवारी न्यायालयात हजर

पुणे : गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असणाऱ्या डीएसकेंच्या कंपनीला यांना गैरमार्गाने कोट्यावधी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँक आॅफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशिल मुहनोत यांना अहमदाबाद अटक करून प्रवासी कोठडीद्वारे शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. 
विभागीय व्यवस्थापक नित्यानंद सदाशिव देशपांडे यांना जयपूर येथून अटक करून प्रवासी कोठडीद्वारे गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बँक आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभाकर मराठे, बँक आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार वेदप्रकाश गुप्ता, डी.एस. कुलकर्णी डेव्हलपर्सचे सनदी लेखापाल सुनिल मधुकर घाटपांडे आणि डी.एस. कुलकर्णी डेव्हलपर्सचे मुख्य अभियंता तसेच उपाध्यक्ष राजीव दुल्लभदास नेवासकर या चौघांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी युक्तीवाद केला. तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सचिन ठोंबरे, अ‍ॅड. शैलेश म्हस्के यांनी विरोध केला.

Web Title: The former president of Bank of Maharashtra will be in custody till June 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.