दुचाकीवर चाललेल्या तरुणावर गोळीबार ; चांदणी चौकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 09:37 PM2019-05-08T21:37:28+5:302019-05-08T21:40:27+5:30

दुचाकीवरून निघालेल्या तरुणावर तिघांनी गोळीबार केला. यामध्ये गोळी लागल्याने तरुण जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावर चांदणी चौकाजवळ घडली.

firing on a two wheeler rider ; incident took place at chandni chowk | दुचाकीवर चाललेल्या तरुणावर गोळीबार ; चांदणी चौकातील घटना

दुचाकीवर चाललेल्या तरुणावर गोळीबार ; चांदणी चौकातील घटना

Next

पिंपरी : दुचाकीवरून निघालेल्या तरुणावर तिघांनी गोळीबार केला. यामध्ये गोळी लागल्याने तरुण जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावर चांदणी चौकाजवळ घडली. गोळीबारामागील  कारण अद्याप समजू शकले नाही. 

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार प्रकाश पिसाळ (वय २५, रा. खेड-शिवापुर) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.  सागर पालवे, राजू तावरे, अतुल चांदणे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडीचे पोलीस निरीक्षक अजय जोंगदंड यांनी याबाबत माहिती दिली. बुधवारी सायंकाळी तुषार हा दुचाकीवरून चालला होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो चांदणी चौकात आला असता आरोपींनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. या हल्ल्यात तुषार जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकूण चांदणी चौकातील वाहतुक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानी  धाव घेतली. जखमी तुषारला पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले. तुषारला शरिरावर नेमक्या कोठे आणि किती गोळ्या लागल्या आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. जखमी अवस्थेतील तुषारने पोलीसांना आरापींची नावे सांगितली. त्यानुसार, पोलीस हल्लेखोरांच्या मागावर आहेत. गोळीबार करण्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: firing on a two wheeler rider ; incident took place at chandni chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.