firefighter did his duty on his holiday | सुट्टीच्या दिवशीही अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य
सुट्टीच्या दिवशीही अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य

फुरसुंगी:  ढमाळवाडी येथील संजूदा कॉम्प्लेक्समधील चौथ्या मजल्यावरील सदनिकेला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. या इमारतीपासून जवळच राहणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवान दत्तात्रय चौधरी यांना सुट्टी असूनही त्यांनी आग लागताच घटनास्थळी पोहोचून वेळीच सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
    
    याबाबत अधिक माहिती अशी, आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी येथील फ्लॅट  क्र. ४०१ मध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये फ्रीज, कपडे, महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले. रूपाली विनायक नायडू यांचा मालकीचा असून शोभा नर्सिंग गुहुज्योत यांना भाड्याने दिला आहे. काळेपडळ येथील दत्तात्रय चौधरी यांना आज सुट्टी होती. त्यांना येथील नागरिकांनी फोन येताच ते घटनास्थळी पोहोचले. आग लागल्याने त्या जवळच असलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊ नये. म्हणून ती सिलेंडरची टाकी त्यांनी बाहेर काढली. यामुळे पुढील घडणारा मोठा अनर्थ टळला. या परिसरातील रस्ता अरुंद असल्याने येथे अग्निशामक दलाची गाडी येण्यास उशीर झाला. परंतु गाडी आल्यानंतर केवळ अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला. यावेळी कैलास टकले, सोमनाथ मोरे, संजय जाधव, दत्ता चौधरी, मारुती शेलार यांनी आटोक्यात आणली.


Web Title: firefighter did his duty on his holiday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.