फिनोलेक्स परिवारातील विसंवाद वाढला : आरोप - प्रत्यारोप सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 01:39 PM2019-04-22T13:39:17+5:302019-04-22T13:58:40+5:30

फिनोलेक्स केबल्स कंपनीवर ताबा मिळविण्यासाठी प्रकाश छाब्रिया यांनी ऑरबिट इलेक्ट्रीकल्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला..

FINOLEX family insights controversy growth : accusation - reciprocity started | फिनोलेक्स परिवारातील विसंवाद वाढला : आरोप - प्रत्यारोप सुरुच

फिनोलेक्स परिवारातील विसंवाद वाढला : आरोप - प्रत्यारोप सुरुच

Next
ठळक मुद्देबनावट कागदपत्रे सादर केली?

पुणे : फिनोलेक्स केबल्स लि. या १५ हजार कोटी रुपये उलाढाल असलेल्या कंपनीच्या मालकीवरुन फिनोलेक्स परिवारातील मतभेद वाढले आहेत. प्रकाश छाब्रिया आणि दीपक छाब्रिया या भावंडांनी एकमेकांवर पुन्हा नवे आरोप केल्याने तिढा वाढला आहे.
फिनोलेक्स केबल्स कंपनीवर ताबा मिळविण्यासाठी प्रकाश छाब्रिया यांनी ऑरबिट इलेक्ट्रीकल्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल ऑरबिट इलेक्ट्रीेकल्सनेही दीपक छाब्रिया यांनी गुंतवणूकदारांच्या व कंपनीच्या हितांचा विचार न करता आरोप केल्याने कंपनीच्या कामगिरीवर दुष्परिणाम होणार असल्याचा आरोप केला. त्यामुळे दोघांमधील वाद वाढण्याचीच शक्यता आहे.
फिनोलेक्स केबल्सचे कार्यकारी अध्यक्ष या पदावर दीपक छाबरिया हे कार्यरत असून गतवर्षी २५ सप्टेंबरला फिनोलेक्स केबल्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी स्वत:ची कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदी पुनर्निवड करुन घेतली होती. त्यावरुन दोन भावात भांडणाची ठिणगी पडली होती. दीपक हे ऑरबिट इलेक्ट्रीकल्सचे अधिकृत प्रतिनिधी असून त्यांनी ऑरबिट इलेक्ट्रीकल्सच्या ठरावाच्या विरुद्ध जात स्वत:ची फिनोलेक्स केबल्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी पुनर्निवड करुन घेतली; दीपक यांची ही भुमिका ऑरबिट इलेक्ट्रीकल्सच्या भुमिकेशी विसंगत असल्याचा आरोप प्रकाश यांनी केला होता. 
प्रल्हाद छाब्रिया यांनी फिनोलेक्स उद्योगसमुहाची स्थापना केली होती.  फिनोलेक्स केबल्सची प्रमोटर कंपनी असलेल्या ऑरबिट इलेक्ट्रीकल्सचे सर्वाधिक समभाग प्रकाश यांच्याकडे आहेत. तर दीपक यांनी त्यांच्यानंतर कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष झाले. प्रकाश यांच्याकडे ‘आॅरबिट’चे सर्वाधिक म्हणजे ७८ टक्के शेअर्स आहेत. दीपक यांच्या मालकीचे ८ टक्के शेअर्स आहेत. फिनोलेक्स केबल्सच्या एकुण शेअर्सपेकी ३२ टक्के शेअर्स ऑरबिट इलेक्ट्रीकल्सकडे आहेत. प्रकाश छाब्रिया यांच्याकडे फिनोलेक्स इन्डस्ट्रीज तसेच स्वत:च्या व परिवारातील सदस्यांच्या माध्यमातून १५ टक्के शेअर आहेत. प्रकाश छाब्रिया यांनी गेल्यावर्षी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दीपक छाब्रिया यांना फिनोलेक्स केबल्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी राहण्यास विरोध केला होता. 
फिनोलेक्स केबल्सवर ताबा मिळविण्यासाठी प्रकाश यांनी ऑर्बिट इलेक्ट्रीकल्सच्या संचालक मंडळाच्या बैैठकीत वडील प्रल्हाद यांनी मृत्यूनंतर त्यांच्याकडील शेअर आपल्या नावावर केल्याचे बक्षिसपत्र सादर केले होते. बैैठकीत प्रल्हाद यांच्याकडील शेअर्स प्रकाश यांच्याकडे हस्तांतरीत करण्याबाबत निर्णय झाला होता. मात्र बक्षिसपत्रातील सह्या जुळत नाहीत, बक्षिसपत्र नोंदणीकृत नसून पुरेशी स्टॅम्प ड्युटीही भरली नसल्याचा आरोप फिनोलेक्स केबल्सच्यावतीने करुन कागदपत्रांबाबत शंका उपस्थित केली होती. शेअर हस्तांतरीत करण्याबाबत ऑरबिट इलेक्ट्रीकल्सच्या बेठकीत पुरेसा कोरम नसल्याने हस्तांतरण चुकीचे असल्याचा आरोपही २६ मार्च रोजी केला होता. मात्र ऑरबिट इलेक्ट्रीकल्सने बुधवारी स्टाक एक्सचेंजमध्ये कागदपत्रे सादर करताना हा आरोप फेटाळून लावला होता. फिनोलेक्स केबल्सने केलेले आरोप हे सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या प्रकरणातील आहेत. फिनोलेक्स केबल्स ही शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपनी आहे; फिनोलेक्स केबल्सने याचा विचार न करता न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या प्रकरणाबाबत आरोप करणे कंपनीच्या व भागधारकांच्या हिताचे नाही, असा आरोप प्रत्युत्तरादाखल पत्रात ऑरबिट इलेक्ट्रीकल्सच्या वतीने करण्यात आला.
 पुणे दिवाणी न्यायालयात दीपक छाब्रिया व त्यांचे वडील किशन यांनी ऑरबिट इलेक्ट्रीकल्सच्यावतीने सादर बक्षिसपत्राला व ऑरबिट इलेक्ट्रीकल्सच्या संचालक मंडळाच्या बैैठकीत झालेल्या निर्णयाला आव्हान दिले आहे. तर ऑर्बिट इलेक्ट्रीकल्सने न्यायालयात याबाबत सादर कागदपत्रांवरुन न्यायालय निर्णय घेईल असे सांगितले आहे. ‘‘दीपक छाब्रिया हे ऑर्बिट इलेक्ट्रिकल्सचे अनाधिकृत प्रतिनिधी असून त्यांनी स्वत:च फिनोलेक्स केबल्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी स्वत:ची नेमणूक करुन घेण्यासाठी मतदान केले. ‘ऑरबिट ’ बोर्डाच्या ठरावाशी ही नेमणूक विसंगत आहे, ’’ असे प्रकाश छाब्रिया यांनी स्पष्ट केले. ऑरबिट इलेक्ट्रिकल्सच्या अधिकृत प्रतिनिधीत्वाशी संबधित कायदेशीर चौकटीच्या विरोधात दीपक यांचे वर्तन असल्याचे प्रकाश छाब्रिया यांचे मत आहे.  
----(समाप्त)----

Web Title: FINOLEX family insights controversy growth : accusation - reciprocity started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.