पुणेकरांना चित्रपटांची मेजवानी; आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम. एम. २ दिवसीय चित्रपट महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:47 PM2018-01-18T12:47:14+5:302018-01-18T12:50:31+5:30

आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम.एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने हा महोत्सव होणार आहे.

Films entertainment for Pune citizens; 16 M. M. 2-Day Film Festival from Aamhi Punekar | पुणेकरांना चित्रपटांची मेजवानी; आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम. एम. २ दिवसीय चित्रपट महोत्सव

पुणेकरांना चित्रपटांची मेजवानी; आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम. एम. २ दिवसीय चित्रपट महोत्सव

Next
ठळक मुद्दे२० आणि २१ जानेवारी रोजी राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या आॅडिटोरियमध्ये होईल महोत्सवनिर्माते गजेंद्र अहिरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे : आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम.एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने हा महोत्सव होणार आहे. २० आणि २१ जानेवारी रोजी लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या आॅडिटोरियमध्ये हा महोत्सव होईल. 
महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता निर्माते गजेंद्र अहिरे यांच्या हस्ते होणार आहे. निर्माते विजय कोंडके, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार उल्हास पवार, एनएफएआयचे संचालक प्रकाश मकदूम, राज्याचे धमार्दाय आयुक्त शिवकुमार डिगे,  गोरक्ष धोत्रे, राजेश तुपकर, मिहिर जोशी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात ‘तू सुखकर्ता, आई, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, चोरावर मोर, तांबव्याचा विष्णू बाळा’ आदी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांना संग्रहालयातील जुन्या चित्रपटांच्या रीळ व यंत्रसामग्रीची माहितीही देण्यात येणार आहे. महोत्सवाचा समारोप २१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता पालकमंत्री गिरीश बापट, आशिष कुलकर्णी, माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Web Title: Films entertainment for Pune citizens; 16 M. M. 2-Day Film Festival from Aamhi Punekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे