पुण्यातील रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:55 AM2018-05-21T11:55:25+5:302018-05-21T12:48:28+5:30

पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दीड लाखाहून अधिक असून रात्रीच्यावेळी दुचाकींच्या मागे ही कुत्री लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अाहे.

fear of Dogs on the streets of Pune | पुण्यातील रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत

पुण्यातील रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत

Next

पुणे : इंग्रजी सिनेमातील हु लेट द डाॅग्ज अाऊट हे गाणं सगळ्यांना माहितच असेल. सध्या पुण्यातील रस्त्यांवरुन फिरताना हे गाणं प्रत्येकाला अाठवतंय, कारण पुण्यातील रस्त्यांवर रात्रीच्यावेळी फिरणे म्हणजे जीव मुठीत धरुनच फिरण्यासारखे अाहे. दिवसेंदिवस पुण्यातील कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली असून त्यांची संख्या दीड लाखाच्या अासपास गेली अाहे. त्यामुळे रस्त्या-रस्त्यांवर त्यांची दहशत पाहायला मिळत अाहे. खास करुन रात्रीच्यावेळी चाैकाचाैकात असणारी भटकी कुत्री दुचाकींच्या मागे लागत अाहेत. त्यामुळे एखाद्याचा अपघात हाेऊन जीव जाण्याची शक्यता अाहे.    

काही दिवसांपूर्वी लेखिका मंगला गाेडबाेले यांना कमला नेहरु उद्यानाजवळ भटक्या कुत्र्यांनी जखमी केले हाेते. गाेडबाेले या रस्त्यावरुन चालल्या असताना मागून अालेल्या कुत्र्याने त्यांच्या हाताला चावा घेतला. त्यांनी त्याला हकलले असता अाजूबाजूच्या अाणखी काही कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्या जखमी झाल्या. मंगला गाेडबाेले यांच्यासाेबत घडलेला प्रसंग अनेक पुणेकरांच्या साेबत घडत अाहे. रात्रीच्यावेळी खासकरुन दुचाकीच्या मागे ही भटकी कुत्री लागत असून  अनेकांचे अपघातही यामुळे झाले अाहेत. या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे लहानमुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पालकांना सतावत अाहे. लहान मुलांना कुत्रे चावल्याच्या घटनाही गेल्या काही काळात समाेर अाल्या हाेत्या. भटकी कुत्री टाेळीने नागरिकांवर हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अाहे. 

ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या जवळ ही कुत्री भटकत असतात. एखाद्याच्या हातात एखादी पिशवी असेल, किंवा काही सामान असेल तर कुत्री त्यांच्यावर हल्ला करत अाहेत. त्याचबराेबर सकाळी माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत अाहे. जाॅगिंक करताना अनेकांच्या मागे ही कुत्री लागत असल्याने नागरिकांना व्यायाम करणेही कठीण झाले अाहे. तसेच ही कुत्री रस्त्यावर कुठेही घाण करीत असल्यामुळे रस्त्यावरुन चालणेही कठीण झाले अाहे.

रात्री उशिरा घरी जाणारा अाेंकार बागडे म्हणाला, घरी जात असताना अनेकदा भटकी कुत्री मागे लागली अाहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच माझ्या अात्यालाही एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला अाहे. रात्री दुचाकी जीव मुठीत धरुनच चालवावी लागते. अादित्य पवार म्हणाला, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या मागे रात्रीच्या वेळी अनेक कुत्री भुंकत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना झाेप मिळत नाही. त्यातच एखादा विद्यार्थी रात्री उशीरा वसतीगृहात येत असेल तर त्याच्या मागे ही कुत्री लागतात.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण अाहे. महेश तळपे म्हणाला, भारती विद्यापीठ भागातही कुत्र्यांचे प्रमाण माेठ्याप्रमाणावर वाढले अाहे. रात्रीच्यावेळी चाैकाचाैकात ही कुत्री दबा धरुन बसलेली असतात. अनेक नागरिक कचरा उघड्यावर टाकत असल्याने या कुत्र्यांना अायतेच अन्न मिळत अाहे. पालकांना अापल्या लहान मुलांना बाहेर एकट्याला साेडायला भीती वाटत अाहे.

कुत्र्यांच्या नसबंदी संबंधीचे नियम कठाेर असल्याने या कुत्र्यांची नसबंदी करण्यात महापालिका प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत अाहे. महापालिकेच्या अाकडेवारीनुसार गेल्या 4 महिन्यात दाेन हजार नऊशे 94 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला अाहे. ही जरी सरकारी अाकडेवारी असली तरी कुत्रा चावलेल्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता अाहे. या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रकाश वाघ यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, सध्या शहरातील दाेन ठिकाणी या भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रीया करण्यात येत अाहे. शस्त्रक्रीया झाल्यानंतर या कुत्र्यांना 4 दिवस देखरेखीखाली ठेवावे लागले. सध्या दाेनच ठिकाणी ही व्यवस्था असल्याने अधिक कुत्र्यांवर शस्त्रक्रीया करता येत नाही.

2017-18 मध्ये 11 हजार कुत्र्यांवर ही शस्त्रक्रीया करण्यात अाली हाेती. या वर्षी हा अाकडा वाढविण्यासाठी अाम्ही काही स्वयंसेवी संस्थांची मदतही घेत अाहाेत. त्यामुळे येत्या काळात अाणखी दाेन ठिकाणी शस्त्रक्रीया केल्यानंतर ही कुत्री ठेवता येणार अाहेत. त्याचबराेबर सेंट्रलिंग डाॅग कॅचिंक हा नवीन उपक्रम सुद्धा अाम्ही हाती घेतला असून या माध्यमातून पूर्वी अॅण्टी रेबीजचे इंजेक्शन दिलेल्या कुत्र्यांची तपासणी करुन गरज असल्यास त्यांना पुन्हा इंजेक्शन देण्यात येणार अाहे. अॅण्टी रेबीज लसीची प्रतिकारशक्ती एका वर्षाची असते. त्यामुळे ज्या कुत्र्यांना हे इंजेक्शन पूर्वी दिले अाहे, त्यांना ते कधी दिले अाहे, पुन्हा कधी देण्याची गरज अाहे, हे कळण्यासाठी विशिष्ट प्रकारचा बेल्ट गुत्र्यांच्या गळ्यात लावण्यात येणार अाहे. येत्या वर्षात 35 हजार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे टार्गेट ठरविण्यात अाले अाहे. 

Web Title: fear of Dogs on the streets of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.