ठळक मुद्देइथे तुम्ही पार्टनरसोबत १००० रुपयांत रोमँटीक डिनर करु शकता.पुण्यातील रेस्टाँरंट्सपैकी ही काही रेस्टाँरंट्स आपल्या लव्हड् वनसोबत वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम आहेत. टेबल सजवून देणे ते सरप्राईज प्लॅन करणे यासाठी इथले कर्मचारी मदत करतात.

पुणे : पुण्यात राहताय किंवा तिकडे जायचा विचार असेल तर हा लेख नक्की वाचा. तिकडे जाऊन छान, शातं ठिकणी तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला घेऊन जायचं असेल तर तिथे कित्येक रोमँटिक हॉटेल्स आहेत, जिथे खास कपल्ससाठी डिनरची व्यवस्था केली जाते. कपल्ससाठी खास सजावटही केली जाते. त्यामुळे प्रत्येक जोडप्याला येथे पुन्हा यावसंच वाटतं. अशाच काही खास रोमँटिक रेस्टॉरंटविषयी आज जाणून घेऊया. 

कोकोपारा

बुफे लंचसाठी प्रसिद्ध असलेलं पुण्यातील सर्वात स्वादिष्ट हॉटेल म्हणजे कोकोपारा रेस्टॉरंट. कॉन्टिनेंटल, नॉर्थ इंडियन, युरोपिअन पदार्थांसाठी कोकोपारा हे हॉटेल फार प्रसिद्ध आहे. या हॉटेलच्या चहूबाजूला असलेली हिरवळ तुमच्या डिनरला अधिक खुलवते. कँन्डल लाईट डिनर, सोबतच लाईव्ह म्युझिक यामुळे तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ जातो. रविवारी येथे फार गर्दी असते. ११०० रुपयात एखादं जोडपं पोटभरून जेवू शकतं. वाडगाव शेरी येथील खराडी-मांढवा पुलाखाली हे हॉटेल आहे.

 

इव्विया स्काय लंग

क्राऊन प्लाझा येथे असलेलं इव्विया स्काय लंग हे देखील सगळ्यात रोमँटीक हॉटेल आहे. डिनर डेटचा विचार करत असाल तर हे हॉटेल उत्तमच आहे. झगमगत्या रोषणाईने या हॉटेलची रचना केल्याने जगापासून कुठेतरी लांब आपण आलो आहोत असा भास होतो. तुम्हाला हव्या त्या गाण्याची फर्माईश तुम्ही येथे करू शकता. त्याचबरोबर जेवणासाठी केलेली इकडची खास आरास म्हणजे लाजवाब. चॉकलेट फिरणी, लँब स्ट्यू, दही के कबाब आणि मर्गी कलम कबाब येथे आवर्जून चाखून पहा.

 

अॅटमॉस्फेअर ६

रोमँटीक डिनरसाठी या रेस्टॉरंटमध्ये खास वेगळी जागा आहे. रुफटॉपवर हे रेस्टॉरंट असल्याने छान मोकळ्या हवेत तुम्ही डिनरचा अनंद घेऊ शकता. नॉर्थ इंडियन, इटालियन आणि चायनिज फूड येथे जास्त प्रमाणात ऑर्डर केली जाते. विमन नगरच्या स्काय मॅक्स मॉलमध्ये हे रेस्टॉरंट आहे. अवघ्या १६०० रुपयात तुम्ही येथे डिनर करू शकता. 

 

कार्निव्हल रेस्टॉरंट अँड बार

फातिमा नगरच्या मुंढवा रोडवरील कार्निव्हल रेस्टॉरंट अँड बार हे हॉटेल सगळ्यात बेस्ट रोमँटीक रेस्टॉरंट आहे असं येथील तरुण मुलं सांगतात. या हॉटेलमध्ये आऊटडोअर डिनरसाठी सगळ्यात जास्त मागणी असते. शिशा, चारकोल चिकन, मुर्घ मुस्सलम, हरा भरा कबाब आणि चिकन रारा हे फूड येथे येऊन एकदा नक्की चाखायलाच हवेत.

 

ट्रिकाया

रुफटॉप रेस्टॉरंटसाठी  प्रसिद्ध असलेल्या रेस्टॉंरंटपैकी हे एक उत्तम रेस्टॉरंट. बधवान परिसरात असलेले हे रेस्टॉरंट आऊटडोर सिटींग डिनरसाठीही प्रसिद्ध आहे. या हॉटेलची रचना, सजावट इतकी आल्हाददायक आहे  की दिवसभराचा थकवा इकडे आल्यावर नक्कीच कमी होतो. शिवाय तुमच्या प्रिय व्यक्तीलाही इकडे आल्यावर हवी तितकी शांतता आणि एकांत मिळू शकेल. चायनिज थाय, मलेशिअन, इंडोनेशिया असे परदेशी फूड्स तुम्हाला येथे चाखायला मिळतील. त्यातही पोर्क रिब्स, डीम सम, ड्रकन पोर्क, पनीर आणि चिकन सटाय एकदा चाखून बघाच.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.