बहि:स्थच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:40 AM2018-08-22T02:40:39+5:302018-08-22T02:41:06+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थच्या विभागातील बीए, बीकॉम या पदवी प्रथम वर्ष व एमए, एमकॉम या पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.

External initiation process begins | बहि:स्थच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

बहि:स्थच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

googlenewsNext

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थच्या विभागातील बीए, बीकॉम या पदवी प्रथम वर्ष व एमए, एमकॉम या पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील बहि:स्थ विभागाच्या लिंकवर जाऊन इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बहि:स्थ विभागाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आल्याची लिंक मंगळवारी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोफाईल तयार करायचे आहे. हे प्रोफाईल तयार करताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक आवश्यक असेल. विद्यार्थ्यांनी लॉग आयडी तयार केल्यानंतर त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती त्यावर भरावी लागेल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता राज्यात एकाही विद्यापीठात बहि:स्थ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थ विभागात राज्यभरातून विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे बहि:स्थ विभागात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बहि:स्थ विभागातून मिळालेली पदवी इतर कोणत्याही विद्यापीठाच्या समकक्ष मानली जाते.
संस्थाचालकांच्या दबावातून काही दिवसांपूर्वी बहि:स्थ विभागाचे शुल्क तिपटीने वाढविण्यात आले होते. बहि:स्थ विभागामुळे महाविद्यालयांचे प्रवेश कमी होत असल्याची तक्रार करून छुप्या पद्धतीने बहि:स्थची शुल्कवाढ करण्यात आली होती. याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन ही शुल्कवाढ मागे घेतली आहे.

प्रक्रिया सुरू; मात्र वेळापत्रकाची माहिती नाही
बहि:स्थ विभागाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून करण्यात आले आहे. मात्र, प्रवेश अर्ज भरण्यासाठी कधीपर्यंत मुदत आहे, पुढील कार्यवाही काय करायची, याबाबतचे वेळापत्रकच देण्यात आलेले नाही.

फोन उचलला जात नसल्याने विद्यार्थी त्रस्त
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थ विभागाकडून चौकशी, तक्रारीबांबत संपर्क साधण्यासाठी एकूण ६ क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, यांतील पहिला क्रमांक दुसºयाच विभागाचा दिलेला आहे, तर उर्वरित क्रमांकावर फोन उचलले जात नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. बहि:स्थ विभागाकडून चौकशीसाठी ०२०-२५६०११११४, ०२०-२५६०११५, ८२७५६९७६३४, ८२७५६९८१९६ असे क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, या क्रमांकावर फोन केला असता उचलला जात नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: External initiation process begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.