डीएसकेंना पैसे भरण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 04:57 AM2018-01-19T04:57:48+5:302018-01-19T04:57:58+5:30

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांचे पैसे भरण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती.

Extension to DSK till January 22 | डीएसकेंना पैसे भरण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

डीएसकेंना पैसे भरण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Next

मुंबई : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांचे पैसे भरण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. ही मुदत संपण्यास काही तास उरले असताना डी. एस. कुलकर्णी यांनी अटकेपासून बचाव करण्याकरिता पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांना २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत, ही मुदतवाढ अंतिम असेल, असेही बजावले. त्यामुळे सोमवारपर्यंत डीएसकेंची अटक टळली आहे.
लोकांना त्यांचे पैसे परत हवे आहेत म्हणून त्यांना तुमची अटक नको आहे. तुम्हाला कारागृहात पाठवून त्यांना पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला व्यवसायात झालेल्या नुकसानीशी गुंतवणूकदारांचे काहीही घेणे-देणे नाही, अशा शब्दांत न्या. साधना जाधव यांनी डीएसकेंना सुनावले. डीएसके यांना गुंतवणूकदारांचे पैसे न्यायालयात जमा करण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देताना न्या. जाधव यांनी या प्रकरणातील तपास अधिकाºयांना पुढील सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले. गुंतवणूकदारांचे किती पैसे द्यायचे आहेत, याची माहिती सादर करण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले.
यापूर्वीही डीएसकेंनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्या वेळी न्यायालयाने गुंतवणूकदारांना परत करायचे असलेल्या २०० कोटी रुपयांपैकी ५० कोटी रुपये डीएसकेंना १९ डिसेंबरपर्यंत भरण्याची अखेरची मुदत दिली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत डीएसके ही रक्कम न्यायालयात जमा करू न शकल्याने उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण काढून घेत पोलिसांचा कारवाईचा मार्ग मोकळा केला. परंतु, डीएसकेंनी याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी भरण्याचा आदेश दिला. मात्र, या मुदतीतही डीएसके ही रक्कम जमा करू न शकल्याने त्यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली.

Web Title: Extension to DSK till January 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.