शहरातील ओढे-नाले सफाईवर पाच वर्षांत ११ कोटी १३ लाखांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 07:00 AM2019-07-11T07:00:00+5:302019-07-11T07:00:02+5:30

तास-दीड तास जोरदार पाऊस झाला की पावसाळी गटारे, ड्रेनेज लाईनचे चेंबर व्हॉअरफ्लो होऊन सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर येत असल्याचे चित्र सर्वत्र पाहिला मिळत आहे...

Expenditure of 11 crore 13 lakhs for cleaning the flanking of the city in five years | शहरातील ओढे-नाले सफाईवर पाच वर्षांत ११ कोटी १३ लाखांचा खर्च

शहरातील ओढे-नाले सफाईवर पाच वर्षांत ११ कोटी १३ लाखांचा खर्च

Next
ठळक मुद्देनाले सफाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च :तरीही तुरळक पावसाने शहर तुंबतेशहरामध्ये सुमारे ३६२ किलो मिटरचे २३४ नाले व उपनाले

पुणे : महापालिकेच्या वतीने गेल्या पाच वर्षांत शहरातील ओढे-नाले, पावसाळी गटारांची स्वच्छता व सफाईसाठी तब्बल ११ कोटी १३ लाख २९ हजार रुपयांचा खर्च केला आहे. महापालिकेकडून नाले सफाईवर दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन देखील पहिल्याच व तुरळक पावसाने देखील शहरातली बहुतेक सर्व रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरुप येते. तास-दीड तास जोरदार पाऊस झाला की पावसाळी गटारे, ड्रेनेज लाईनचे चेंबर व्हॉअरफ्लो होऊन सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर येत असल्याचे चित्र सर्वत्र पाहिला मिळत आहे.
पुणेकरांचा पावसाळा सुखकर जावा यासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पावसाळापूर्व कामांपैकी सर्वांत महत्वाचे काम म्हणजे शहरातील ओढे-नाले व पावसाळी गटारांची सफाई. सध्या संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी सुमारे ३६२ किलोमीटरचे २३४ नाले-उपनाले अस्तित्वात आहेत. महापालिकेच्या वतीने पावसाळा सुरु होण्यापूर्वी दरवर्षी शहरातील सर्व ओढे-नाले, पावसाळी गटारे यांची सफाई केली जाते. या ओढे-नाले सफाईवर दर वर्षी सरासरी दीड ते दोन कोटी रुपये खर्च केला जातो. यंदा देखील शहरामध्ये शंभर टक्के नाले साईफ करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, हा दावा शहरामध्ये झालेल्या पाहिल्याच पावसात वाहून गेला. शहरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर साठलेले पाणी व त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांची पुरती दैना उडाली आहे. 
---
शहरातील ६० टक्के रस्त्यांवर पाणी वाहून नेण्यासाठी गटारांची व्यवस्थाच नाही
सध्या शहरामध्ये सुमारे १४०० किलो मिटरचे रस्ते असून, यापैकी तब्बल ६० टक्के रस्त्यांवर गटारांची व्यवस्थाच नसल्याचे महापालिकेतील अधिकृत सुत्रांनी सांगितले. शहरातील अनेक मोठ्या रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठीची कोणतीही व्यवस्था नसल्यानेच पावसाची एखादी चागंली सर येऊन गेली तरी रस्त्यांना ओढा-नाल्याचे स्वरुप येते. रस्त्यांवर गटारांची व्यवस्था नसली रस्ते करताना पाणी सहजरित्या वाहून जाईल याची कोणतीही सोय महापालिकेकडून केलेली नाही. यामुळे देखील बहुतेक सर्व प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 
----
शहरामध्ये ओढे-नाले दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत झालेला खर्च
परिमंडळ कार्यालय    ओढे-नाल्यांची संख्या    खर्च
परिमंडळ क्रमांक १    ३९        १ कोटी ५६ लाख ६९ हजार
परिमंडळ क्रमांक २    ७६        ३ कोटी २८ लाख ६५ हजार
परिमंडळ क्रमांक ३    ६४        २ कोटी ३० लाख ७२ हजार
परिमंडळ क्रमांक ४    २७        १ कोटी ३२ लाख ६८ हजार
परिमंडळ क्रमांक ५    ११        २ कोटी ६४ लाख २९ हजार


 

Web Title: Expenditure of 11 crore 13 lakhs for cleaning the flanking of the city in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.