गुजराथ निवडणुकीत परिवर्तन अटळ: मोहन प्रकाश; छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 03:43 PM2017-11-18T15:43:37+5:302017-11-18T15:54:00+5:30

शहर काँग्रेसच्यावतीने पंडित भिमसेन जोशी कलादालन येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवन चरित्रावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले.

eversion in Gujarat elections: Mohan Prakash; The opening of the photo exhibition | गुजराथ निवडणुकीत परिवर्तन अटळ: मोहन प्रकाश; छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन 

गुजराथ निवडणुकीत परिवर्तन अटळ: मोहन प्रकाश; छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन 

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदर्शनामध्ये इंदिरा गांधी यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीपर्यंतची छायाचित्रे वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहर काँग्रेसतर्फे तयार करण्यात आला चित्ररथ

पुणे : गुजराथमध्ये जीएसटीमुळे व्यापारी रस्त्यावर आलेला आहे, बरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आहे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, हार्दिक पटेल सारख्या तरूणांवर दडपशाही सुरू आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत गुजराथच्या सत्तेमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी शनिवारी व्यक्त केले.
शहर काँग्रेसच्यावतीने पंडित भिमसेन जोशी कलादालन येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवन चरित्रावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
मोहन प्रकाश म्हणाले, ‘‘सध्याच्या सरकारकडून लोकांना केवळ वर्तमानातच रहायला लावले जात आहे. मात्र या देशाला लाभलेला वैभवशाली इतिहासाला विसरता येणार नाही. इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशाला पाकिस्तानपासून मुक्त करून स्वतंत्र केले. त्यांच्या या कर्तृत्त्वाची दखल संपूर्ण जगाला घ्यावी लागली. सिक्किमला भारताचा अविभाज्य भाग बनविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. हा इतिहास आजच्या तरूण पिढीसमोर मांडला गेला पाहिजे. भारतीय उपखंडाचा इतिहास ज्यावेळी लिहला जाईल त्यावेळी इंदिरा गांधी यांचे नाव सुवर्णक्षरांनी लिहले जाईल.’’
इंदिरा गांधीवरील छायाचित्र प्रदर्शनामध्ये त्यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीपर्यंत अनेक छायाचित्रे लावण्यात आली आहेत. यामध्ये अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. यातील अनेक छायाचित्रे आपणास पहिल्यांदाच पहायला मिळाल्याचे मोहन प्रकाश यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय छाजेड यांनी केले. यावेळी निता रजपूत, रमेश अय्यर, आनंद छाजेड, राजेंद्र खळदकर, शानी नौशाद, महेश गायकवाड, रणजित गायकवाड आदी उपस्थित होते. 
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने एक चित्ररथ तयार करण्यात आला आहे. यामध्ये वसंतदादा पाटील यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर या चित्ररथामध्ये एक एलसीडी स्क्रिन बसविण्यात आली आहे. हा चित्ररथ पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

Web Title: eversion in Gujarat elections: Mohan Prakash; The opening of the photo exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.