इथोपियाचा 'अटलाव डेबेट' ठरला 33 व्या पुणे मॅरेथॉन 'विजयाचा मानकरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 01:58 PM2018-12-02T13:58:59+5:302018-12-02T13:59:26+5:30

शहरातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या सारसबागेजवळूनच पुणे मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती

Ethiopia's 'Attlee Debate' was the 33rd Pune Marathon Award winner | इथोपियाचा 'अटलाव डेबेट' ठरला 33 व्या पुणे मॅरेथॉन 'विजयाचा मानकरी'

इथोपियाचा 'अटलाव डेबेट' ठरला 33 व्या पुणे मॅरेथॉन 'विजयाचा मानकरी'

Next

पुणे - 33 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. यंदाही या स्पर्धेच अफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व राहिले. इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. डेबेड याने 42 किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत 102 परदेशी नागरिकांसह 15 हजार स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. 

शहरातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या सारसबागेजवळूनच पुणे मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. येथील बाबुराव सणस मैदानापासून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. विविध अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फुल मॅरेथॉन (मुख्य) 42 किमी, हाफ मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी, 5 किमी, व्हीलचेअर या अशा विविध अंतरगटांचा समावेश आहे. पुणेकरांनी सर्वच अंतरातील स्पर्धेसाठी उत्साह दाखवला. सामाजिक जाणीवांचे भान ठेवून आणि सामाजिक जनजागृतीसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सन 1983 पासून दरवर्षी ही स्पर्धा तितक्याच उत्साहाने पार पडते. आजही रविवारची सुट्टी असल्यामुळे स्पर्धकांसह इतर पुणेकरांनीही या स्पर्धेत सहभागी होत दाद दिली.

Web Title: Ethiopia's 'Attlee Debate' was the 33rd Pune Marathon Award winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.