पुणे : मित्रांसोबतची पार्टी पडली महागात, इंजिनिअर तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 11:51 AM2018-02-20T11:51:35+5:302018-02-20T12:40:29+5:30

मित्राकडे जातो असे सांगून अनुपम घरातून बाहेर पडला. त्याच्या मित्राच्या नातेवाईकाचा फ्लॅट बालेवाडीतील 43 प्रायव्हेट सोसायटीत आहे.

Engineer student fallen from terrace after partying with friends in Pune | पुणे : मित्रांसोबतची पार्टी पडली महागात, इंजिनिअर तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : मित्रांसोबतची पार्टी पडली महागात, इंजिनिअर तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

Next

पुणे :मित्रांसोबत पार्टी करणा-या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याचा 13 व्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना बालेवाडी येथील 43 प्रायव्हेट सोसायटीत रविवारी रात्री घडली. अनुपम विलास पाटील (वय 20, रा़ एलाइट एम्पायर सोसायटी, बालेवाडी) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की अनुपम एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत होता. रविवारी रात्री मित्राकडे जातो, असे सांगून अनुपम घरातून बाहेर पडला. त्याच्या मित्राच्या नातेवाईकाचा फ्लॅट बालेवाडीतील 43 प्रायव्हेट सोसायटीत 13 व्या मजल्यावर आहे. ते कोल्हापूरला राहायला आहेत़. अनुपम व त्याच्या चार मित्रांनी पार्टी करायचे ठरविले होते़. त्यांनी फ्लॅटवर मद्याच्या बाटल्या व जेवणही आणले, रात्री साडेअकराच्या सुमारास अनुपम आणि त्याचे मित्र बाल्कनीत थांबले होते़. अनुपम बाल्कनीतील शिडीवर चढण्याचा प्रयत्न करीत होता. या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो सोसायटीच्या आवारात पडला. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले़ परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सोसायटीतील सुरक्षारक्षक व रहिवाशांकडे चौकशी केली़ त्याच्या मित्रांकडेही चौकशी करण्यात आली असून त्यात संशयास्पद काहीही आढळून आले नाही़.

Web Title: Engineer student fallen from terrace after partying with friends in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे