भीमाशंकर येथील कोंढवळच्या धबधब्यात अभियंता बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 10:03 PM2018-09-27T22:03:38+5:302018-09-27T22:05:24+5:30

भीमाशंकर अभयारण्यात कोंढवळ जवळ असलेल्या धबधब्यात अभियंता तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

Engineer drown in waterfalls of Bhimashankar | भीमाशंकर येथील कोंढवळच्या धबधब्यात अभियंता बुडाला

भीमाशंकर येथील कोंढवळच्या धबधब्यात अभियंता बुडाला

Next
ठळक मुद्देमित्रांकडून पाण्यात उडया मारून शोध घेण्याचा प्रयत्न

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यात कोंढवळ जवळ असलेल्या धबधब्यात अभियंता तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. 
गुणवंत दत्तात्रय पाटील (वय २४)असे त्याचे नाव आहे. तो मुळचा नंदुरबार येथील रहिवासी असून कल्याणी टेक्नो फोर्स कन्हेरसर येथे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत होता. गुरवारी सुटी असल्याने कंपनीमधील निखील जगताप, अक्षय जाधव, मयुर पवार, दत्ता जाधव, नितीन झिने, नितीन गोरे, अरविंद बोंबे, अक्षय ढेरंगे, सचिन पाटील व गुणवंत पाटील हे मोटार सायकलवरुन सकाळी भिमाशंकरला दर्शनासाठी निघाले. भीमाशंकरच्या अलिकडे दोन किलोमीटर कोंढवळ फाटा येथे त्यांनी कोंढवळ धबधब्याचा फलक पाहिला. 
धबधब्यावर गेल्यानंतर आंघोळीसाठी सर्व जण पाण्यात उरतले. पाण्याबाहेर आल्यानंतर गुणवंत गायब असल्याचे इतरांच्या लक्षात आले. त्याला पोहता येत नव्हते. त्याच्या मित्रांनी पाण्यात उडया मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा तपास लागला नाही. कोंढवळ ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला.
त्याला पाण्यातून बाहेर काढल्या बरोबर तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तपासणी केल्यावर त्याला घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला. 
 

Web Title: Engineer drown in waterfalls of Bhimashankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.