हिंगणगावला ५६ एकरांवरील अतिक्रमण हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:55 PM2018-12-15T23:55:34+5:302018-12-15T23:56:41+5:30

वनजमिनींनी घेतला मोकळा श्वास : ४० जणांवर अधिकाऱ्यांनी केला गुन्हा दाखल

The encroachment on 56 acres was removed from Hingangala | हिंगणगावला ५६ एकरांवरील अतिक्रमण हटवले

हिंगणगावला ५६ एकरांवरील अतिक्रमण हटवले

Next

काटी : इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील फॉरेस्ट गट नं. २७, २०८ या ५६ एकर वनजमिनीवरील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई करण्यात आली. वन खात्याने धडक मोहीम राबवून ४० जणांवर वनजमिनीवर अतिक्रमण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून ५६ एकर वनजमीन ताब्यात घेतली आहे.

सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी १४० वनकर्मचारी व राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी क्र. ११ यांनी धडक मोहीम राबवली. हिंगणगाव येथील फॉरेस्ट गटाचे सर्वेक्षण व सीमांकन पुणे वन विभागाचे वन सर्वेक्षक
अधिकारी जाधव व त्यांचे सहकारी यांनी केले. त्यानंतर सुमारे ४० जणांनी सुमारे ५६ एकर क्षेत्रावर शेतीचे, गोठ्याचे व इतर अतिक्रमण केल्याचे वन विभागाला आढळून आले होते. त्यानंतर वन विभागाने भारतीय वन अधिनियम १९२७च्या वन कायद्यानुसार व इतर तरतुदीनुसार संबंधित इसमांवर गुन्हा नोंदविला आहे. वन गुन्ह्याची नोंद इंदापूर न्यायालयात नोंदवली आहे. संबंधितांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन कर्मचाºयांनी अतिक्रमण हटविण्याबाबत समज दिली होती. त्यानंतर काही लोकांनी अतिक्रमण हटवले; परंतु राहिलेले
अतिक्रमण १४० वन विभागाच्या ताफ्याने हटवले.  त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वनजमिनीने मोकळा श्वास घेतला आहे. या कारवाईसाठी सहायक वनसंरक्षक तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांच्यासह महादेव हजारे दोड, गोरीशंकर सुपेकर, बारामती, प्रकाश चौधरी, राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी क्र. ११ तसेच बारामती, दौंड, हवेली, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, भोर, मावळ इत्यादी
वनसंरक्षक वनपाल कर्मचारी उपस्थित होते. विवेक खांडेकर प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक लक्ष्मी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. जून २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत अतिक्रमण हटवलेल्या वनजमिनीवर झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जून २०१७ पासून शेटफळ गढे, न्हावी, शेळगाव, डाळज १, २, गागरगाव, बिजवडी कर्मयोगी कारखान्याच्या परिसरातील अतिक्रमण वनक्षेत्रावर कारवाई करून २३९ एकर वनजमिनी वन विभागाने ताब्यात घेतल्या आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांनी दिली.
 

Web Title: The encroachment on 56 acres was removed from Hingangala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे