राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अकरावीची प्रश्नपेढी उपलब्ध; नीट, जेईईच्या परीक्षेसाठी उपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:16 PM2018-01-31T13:16:15+5:302018-01-31T13:23:33+5:30

राज्य मंडळाने मेडिकल व इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी नीट व जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी ११ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आॅनलाइन प्रश्नपेढी तयार केली असून, ही प्रश्नपेढी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

The eleventh standard question paper is available on the State Board's website; useful for JEE, NEET exam | राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अकरावीची प्रश्नपेढी उपलब्ध; नीट, जेईईच्या परीक्षेसाठी उपयोगी

राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अकरावीची प्रश्नपेढी उपलब्ध; नीट, जेईईच्या परीक्षेसाठी उपयोगी

Next
ठळक मुद्देरसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांची प्रश्नपेढी लवकरच उपलब्ध करून दिली जाणार इयत्ता १२वीच्या अभ्यासक्रमाची प्रश्नपेढी

पुणे : राज्य मंडळाने मेडिकल व इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी नीट व जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी ११ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आॅनलाइन प्रश्नपेढी तयार केली असून, ही प्रश्नपेढी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांची ही प्रश्नपेढी आहे. त्याचबरोबर इयत्ता १२वीच्या अभ्यासक्रमाची प्रश्नपेढी लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. 
राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांकडून राज्य मंडळाने प्रश्न मागविले होते. शिक्षकांनी पाठविलेल्या या प्रश्नांमधून तज्ज्ञांमार्फत निवड करून ही प्रश्नपेढी तयार करण्यात आली आहे. परीक्षेला या प्रश्नपेढीमधीलच प्रश्न विचारले जातीलच असे नाही, विद्यार्थ्यांना सरावासाठी ही प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  
परीक्षेतील सर्व प्रकारच्या प्रश्नप्रकारांबाबत विद्यार्थ्यांना पूर्ण कल्पना यावी, प्रश्नपत्रिका आराखड्याबाबतची भीती व गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनातून जावा यासाठी ही प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: The eleventh standard question paper is available on the State Board's website; useful for JEE, NEET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.