‘सहस्त्रक मतदारांचा’ शोध घेण्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:58 PM2017-11-22T14:58:20+5:302017-11-22T15:02:37+5:30

‘सहस्त्रक मतदारांचा’ (मिलेनियम वोटर्स) शोध घेऊन अधिकाधिक नोंदणी करण्याच्या सूचना केंद्रिय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिल्या आहेत.

Election commission special campaign to search 'Sahastrak Voters' | ‘सहस्त्रक मतदारांचा’ शोध घेण्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष मोहीम

‘सहस्त्रक मतदारांचा’ शोध घेण्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष मोहीम

Next
ठळक मुद्देवयाची १८-१९ वर्षे पूर्ण करणारे तरुण मतदार नाव नोंदणीसाठी प्रवृत्त होतील, अशा दृष्टीने उपक्रमप्रत्येक राज्यात सरासरी २ हजार तर प्रत्येक जिल्ह्यात १०० याप्रमाणे असावेत सहस्त्रक मतदार

पुणे : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान ‘सहस्त्रक मतदारांचा’ (मिलेनियम वोटर्स) शोध घेऊन अधिकाधिक नोंदणी करण्याच्या सूचना केंद्रिय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. २१ व्या शतकाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २००० रोजी ज्यांचा जन्म झाला आहे आणि ज्यांच्या वयाची १८ वर्ष पूर्ण होत आहेत अशा मतदारांनी पुढे येण्यासाठी प्रोत्साहनपर मोहीम आखण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक प्रमुख मोनिका सिंग यांनी दिली.
अशा मतदारांना शोधून त्यांची मतदार यादीत नाव नोंदविणे तसेच, ज्यांचे अर्ज मतदार यादीत आलेले आहेत तसेच ज्यांची नावे नावे अंतिम मतदार यादीत येणार आहेत अशा मतदारांची नावे शोधून त्यांचा राष्ट्रीय मतदार दिवसाला सत्कार करण्यात येणार आहे. वयाची १८ ते १९ वर्षे पूर्ण करणारे तरुण मतदार नाव नोंदणीसाठी प्रवृत्त होतील, अशा दृष्टीने उपक्रम राबविण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. 
भारतामध्ये दरदिवसाला ७४ हजार मुलांचा जन्म होतो. प्रत्येक राज्यामध्ये सरासरी दोन हजार तर प्रत्येक जिल्ह्यात १०० याप्रमाणे सहस्त्रक मतदार असावेत असे अपेक्षित आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर संकेतस्थळ व सोशल मीडियाच्या माध्यमातून सहस्त्रक मतदारांना मतदार नोंदणीसाठी प्रवृत्त करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायत, रुग्णालये, जन्ममृत्यूचे दाखले देणारे अधिकारी आदींच्या माध्यमातून या मतदारांचा शोध घेतला जाणार आहे. जे सहस्त्रक मतदार नोंदणी करतील त्यांचा घरी जाऊन मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडून सत्कार केला जाणार आहे. यासोबतच राष्ट्रीय मतदार दिवस २०१८ रोजी तरुण मतदारांच्या समवेत  ‘मी भारताचा सहस्त्रक मतदार आहे’ असे लिहिलेला खास बॅचही त्यांना देण्यात येणार आहे. 
अशा सहस्त्रक मतदारांनी त्यांची छायाचित्र व मतदार ओळखपत्र त्यांच्या फेसबुक पेजवर टाकावे आणि निवडणूक अधिका-यांना टॅग करावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत या मतदारांना वैयक्तिक स्वरुपाची प्रमाणपत्रेही देण्यात येतील. सहस्त्रक मतदारांची त्यांच्या महाविद्यालयात अथवा अन्य ठिकाणी ‘कॅम्पस अ‍ॅम्बॅसीडर’ म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयात नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या ‘निवडणूक साक्षरता क्लब’मध्ये पहिला सदस्य म्हणून नोंद करण्यात येणार आहे. जे मतदार शैक्षणिक प्रवाहात समाविष्ट नसतील त्यांना चुनाव पाठशालामध्ये नोंदविण्यात येणार आहे. 

Web Title: Election commission special campaign to search 'Sahastrak Voters'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.