महापुरुषांची बदनामी केल्याबाद्दल शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : संभाजी ब्रिगेड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 05:50 PM2018-10-15T17:50:42+5:302018-10-15T22:03:39+5:30

महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांंनी राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र अांदाेलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात अाला.

education minister should resign for condemning idols of maharashtra | महापुरुषांची बदनामी केल्याबाद्दल शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : संभाजी ब्रिगेड

महापुरुषांची बदनामी केल्याबाद्दल शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : संभाजी ब्रिगेड

Next

पुणे : राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत एकूण 464 पुस्तके असून राज्यात 1 लाख 21 हजार प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येकी 200 पुस्तके वाटण्यात अाली अाहेत. त्यातील 27 पुस्तकांमध्ये बहुजन महापुरुषांची बदनामी करण्यात अाली असून ही पुस्तके तात्काळ मागे घेऊन शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र अांदाेलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात अाला अाहे.
 
    तसेच या बदनामीला दाेषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे निलंबन करावे व लेखक, प्रकाशक, वितरक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही पुण्यात अायाेजित पत्रकार परिषदेत करण्यात अाली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, अर्थक्रांतीचे राज्य समन्वयक प्रभाकर काेंढाळकर अादी उपस्थित हाेते. या सर्व वादग्रस्त पुस्तकांचे लेखक हे अारएसएसशी संबंधित असून त्यांनी खाेटा इतिहास पसरविण्याचं षडयंत्र अाखल्याचा अाराेप करण्यात अाला. 

    संताेष शिंदे म्हणाले डाॅ. शूभा साठे लिखित 'समर्थ रामदास स्वामी' पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांचा ''दारुड्या'' असा उल्लेख करुन 'राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला हाेता अशी बदनामी करण्यात अाली अाहे.' तर गाेपीनाथ तळवळकर लिखीत 'संताचे जिवन प्रसंग' पुस्तकात तुकाराम महाराजांना ''हे अामचं येडं'' असे त्यांच्या पत्नीच्या ताेंडातून वदवून घेण्यात अाले अाहे. प्र. ग. सहस्त्रबुध्दे लिखीत छत्रपती 'राजा शिवाजी' यात शिवरायांचे रामदासीकरण करण्यात अालेले अाहे. तर डाॅ. प्रभाकर चाैधरी लिखीत 'सदगुणांच्या गाेष्टी' या पुस्तकात रामदास शिवरायांना म्हणतात ''सारं राज्य मला देवून टाकल्यावर तुम्ही काय करणार...? शिवाजी महाराज म्हणाले, ''मी तुमच्या साेबत चालेन, भिक्षा मागेन.'' अाणि राजांनी डाेक्याचा पटका साेडून त्याची झाेळी केली. असा उल्लेख करण्यात अाला अाहे. 27 पुस्तकांमध्ये महापुरुषांची बदनामी केली असून ही पुस्तके अंधश्रद्धा, कर्मकांड, देवदेवतांचे उदात्तीकरण करणारी अाहेत. याप्रकरणी अाम्ही विश्रामबागवाडा पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली अाहे. सरकारने ही सर्व पुस्तके 48 तासांच्या अात परत घ्यावीत तसेच विनाेद तावडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र अांदाेलन करेल. 

Web Title: education minister should resign for condemning idols of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.