सरकारच्या उदासीनतेमुळे मुठा कालव्यावरील पूल कोसळला, सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 02:24 AM2019-01-24T02:24:28+5:302019-01-24T02:26:14+5:30

बोरीभडक (ता. दौंड) येथील दुरवस्था झालेला नवीन मुठा कालव्यावरील पूल आज पहाटे कोसळला. सुदैवाने पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने कसलाही अपघात अथवा जीवित हानी झाली नाही.

Due to government's negligence, the bridge over Muth Canal collapses, allegations against Supriya Sule Girish Mahajan | सरकारच्या उदासीनतेमुळे मुठा कालव्यावरील पूल कोसळला, सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांवर आरोप

सरकारच्या उदासीनतेमुळे मुठा कालव्यावरील पूल कोसळला, सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांवर आरोप

Next

यवत : बोरीभडक (ता. दौंड) येथील दुरवस्था झालेला नवीन मुठा कालव्यावरील पूल आज पहाटे कोसळला. सुदैवाने पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने कसलाही अपघात अथवा जीवित हानी झाली नाही.
काही वर्षांपासून बोरीभडक गावाकडे जाणाया रस्त्यावरील पूल धोकादायक बनला होता. पाटबंधारे विभागाने काही महिन्यांपूर्वी पुलावरील वाहतूक बंद केली होती. यामुळे पुलावरून कसलीही वाहतूक होत नव्हती. मात्र, एका महिन्यापूर्वी गावातील काही युवकांनी पुलाच्या बाजूला टाकलेले काटे हटवून परत पुलावरून वाहतूक सुरू केली होती. मात्र, वाहतूक सुरू झाली असली तरी अवजड वाहतूक पुलावरून होत नव्हती.
बोरीभडक गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असणारा पूल आता पूर्णत: पडल्याने गावातील ग्रामस्थांना मोठा वळसा घालून बोरीऐंदी गावाकडे जाणाºया पुलाचा वापर वाहतुकीसाठी करावा लागणार आहे. मात्र, बोरीऐंदीच्या रस्त्यावरील पूलदेखील मोडकळीस आलेला असल्याने त्याही पुलावरून वाहतूक धोकादायक बनली आहे. भविष्यात तोही पूल पडल्यास हजारो नागरिकांची मोठी गौरसोय होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच नवीन मुठा कालव्याचे आवर्तन सुरू झाले आहे. यामुळे नवीन पुलाचे काम सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. पुल कोसळल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यास नागरिकांची मोठी अडचण होऊ शकते.
>आमदार राहुल कुल यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य अधिकारी पांडुरंग शेलार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. वाय. पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यावर खांबविरहित रचना असलेला पूल बांधण्याचे ठरले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रचना बदलून दिल्यानंतर जलसंपदा विभागानेदेखील नवीन खांबविरहित पुलाच्या रचनेला मान्यता दिली असून, लवकरच पुलाचे सुरू केले जाईल, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बोरीभडक येथील पूल पडल्याने एकाच पुलावरून वाहतूक सुरू राहील. पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, यासाठी आमदार राहुल कुल व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला असून लवकरच नवीन पुलाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा असल्याचे बोरीभडक गावचे उपसरपंच विकास आतकिरे व माजी सरपंच दशरथ कोळपे यांनी सांगितले.

Web Title: Due to government's negligence, the bridge over Muth Canal collapses, allegations against Supriya Sule Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.