दुष्काळाच्या झळा वाढल्या : पुण्यात महिन्याभरात पन्नास टँकर वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 08:11 PM2019-01-17T20:11:53+5:302019-01-17T20:15:16+5:30

दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या पन्नासने वाढली आहे.

Due to the drought, the increase in the number of ponds in Pune | दुष्काळाच्या झळा वाढल्या : पुण्यात महिन्याभरात पन्नास टँकर वाढले 

दुष्काळाच्या झळा वाढल्या : पुण्यात महिन्याभरात पन्नास टँकर वाढले 

Next

पुणे: दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या पन्नासने वाढली आहे. त्यामुळे पुणे विभागातील टँकरची संख्या आता १५७ पर्यंत गेली आहे.त्यात साता-यात ५५,पुण्यात ४६ आणि सांगलीत ४४ टँकर सुरू आहेत.

                कोल्हापूर जिल्हा वगळता पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चारही जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार १७ डिसेंबर २०१८ रोजी पुणे विभागात १०७ टँकर्स सुरू होते. दुष्काळाची तीव्रता वाढल्याने १७ जानेवारी २०१९ रोजी विभागात १५७ टँकर्सने पाणी पुरवठा सुरू आहे. डिसेंबर महिन्यात १७ तारखेला दुष्काळ बाधितांची संख्या २ लाख ६ हजार २१३ एवढी होती.

 जानेवारी महिन्यात याच तारखेला बाधितांची संख्या ३ लाख ७ हजार १७८ पर्यंत वाढली.

साता-यात डिसेंबर महिन्यात ४६ टँकर होते. बरोबर एका महिन्यात साता-यातील टँकरची संख्या ५५ पर्यंत वाढली. त्यात माण तालुक्यात सर्वाधिक टँकर वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या १७ डिसेंबर रोजी ३८ होती. परंतु, १७ जानेवारी २०१९ रोजी ही संख्या ४६वर गेली. तसेच सांगलीतील टँकरची संख्या एका महिन्यात १८ वरून ४४ पर्यंत वाढली आहे. महिना भरात टँकरची संख्या ५० ने वाढल्यामुळे उन्हाळा सुरू झाल्यानंतर टँकरचा आकडा चांगलाच मोठा झालेला दिसून येईल,असे विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

Web Title: Due to the drought, the increase in the number of ponds in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.