नागपूरचे अधिवेशन बालहट्टामुळे : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 09:40 PM2018-07-06T21:40:34+5:302018-07-06T21:41:58+5:30

यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे.

Due to the Convention of Nagpur, Ajit Pawar: Ajit Pawar | नागपूरचे अधिवेशन बालहट्टामुळे : अजित पवार 

नागपूरचे अधिवेशन बालहट्टामुळे : अजित पवार 

पुणे : यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे.त्यांच्या या हट्टापायी अधिवेशानाचा पहिला आठवडा पाण्यात गेला आहे असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केला आहे. अधिवेशन परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्या हे काय चाललय असा सवालही त्यांनी केला. शेतकरी वर्गाला दीडपट हमी भाव जाहीर करणे म्हणजे मध्य निवडणुका लागण्याची शक्यता असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की,नागपूर येथील अधिवेशन मुहूर्त पाहून सोमवार ऐवजी बुधवारपासून अधिवेशन सुरु केले आहे.आपण कुठल्या काळात आहोत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.  ते पुढे म्हणाले की, नागपूरमध्ये नालेसफाई झाली नसल्याने ही अवस्था ओढवली.नागपूरपासून दिल्ली पर्यंत भाजपचेच सरकार आहे. तरीदेखील तिथे पाणी तुंबले आहे.याला जबाबदार कोण आहे.असा सवाल देखील उपस्थित केला.ज्या नागपूराचे केंद्रीयमंत्री आणि मुख्यमंत्री असताना ही अवस्था एका पावसाने केली.तर राज्यातील सर्व सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल असा खरपूस समाचार देखील त्यांनी घेतला.

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे -

  • कालचा दिवस सिडको व्यवहाराच्या गोंधळात गेला, काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वेगळं सांगितलं, आज जमिनीचे सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सिडकोची हजारो कोटींची जमीन  जमीन मातीमोल भावात देण्यात आली. 
  • पाणी साचल्यानंतर आज ड्रेनेज साफ  करताना दारूच्या बाटल्या सापडल्या, हे दुर्दैवी आहे. आज संपूर्ण नागपूर जलमय झालं आहे. 
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चुनावी जुमले पुन्हा सुरू झाले आहेत, हमीभावाच दिडपड देऊ सांगितलं जातं पण यातही घोळ आहे. 
  • शिवसेनेचे आमदारही नाराजी व्यक्त करत म्हणले हे मुंबईत झालं असतं तर आमच्यावर टिकेची झोड उठली असती, पण मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने काही शब्द नाही.
  • कामकाजावर केला जाणार लाखोंचा खर्च वाया जात आहे, ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करावी.

 

Web Title: Due to the Convention of Nagpur, Ajit Pawar: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.