घराच घरपण हिरावून घेणा-या डीएसकेंना मंगळवारपर्यंत कोर्टाकडून दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 04:50 PM2017-11-04T16:50:41+5:302017-11-04T16:52:56+5:30

गुंतवणुकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

DSK, who deprives home of the house, gets relief from the court till Tuesday | घराच घरपण हिरावून घेणा-या डीएसकेंना मंगळवारपर्यंत कोर्टाकडून दिलासा

घराच घरपण हिरावून घेणा-या डीएसकेंना मंगळवारपर्यंत कोर्टाकडून दिलासा

Next

पुणे - बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती यांना मंगळवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. दीपक सखाराम कुलकर्णी डी एस के यांच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे सत्र न्यायाधीश जे टी उत्पात यांनी दिला निर्णय दिला. 

7 नोव्हेंबरला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. गुंतवणुकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीबरोबरच महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. 

या शिवाय संस्थेने विश्वासघात केल्याचा आणि गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्याची कलमे लावली आहेत. जितेंद्र नारायण मुळेकर यांनी फिर्याद दिली आहे. या शिवाय पाचशेहून अधिक तक्रारदारांनी अर्ज केला आहे.

Web Title: DSK, who deprives home of the house, gets relief from the court till Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा