डीएसके प्रकरण: फॉरेन्सिक ऑडीटरचा अहवाल महिन्यात द्या; कोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 03:31 AM2019-03-12T03:31:30+5:302019-03-12T03:31:47+5:30

गुंतवणूकदारांची डीएसकेंनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी यासंदभार्तील फॉरेन्सिक ऑडीटरचा अंतरिम अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा असा आदेश कोर्टाने दिला आहे.

DSK Case: Monthly Report for Forensic Auditors; Court order | डीएसके प्रकरण: फॉरेन्सिक ऑडीटरचा अहवाल महिन्यात द्या; कोर्टाचा आदेश

डीएसके प्रकरण: फॉरेन्सिक ऑडीटरचा अहवाल महिन्यात द्या; कोर्टाचा आदेश

Next

पुणे : गुंतवणूकदारांची डीएसकेंनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी यासंदभार्तील फॉरेन्सिक ऑडीटरचा अंतरिम अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा असा आदेश कोर्टाने दिला आहे. विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
सोमवारी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी डीएसकेंकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची यादी सीडी आणि पेनड्राईव्ह स्वरुपात कोर्टात सादर केली.

डीएसके प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु आहे. गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यासंदभार्तील प्राधान्य यादी सादर करण्यात यावी. आणि याप्रकरणात फॉरेन्सिक आॅडिटरचा रिपोर्ट सादर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्यासाठी पोलिसांनी वेळ मागितला होता. फॉरेन्सिक आॅडिटरचा रिपोर्टरचा अंतरिम अहवाल एक महिन्यात देण्यात यावा, असा आदेश कोर्टाने दिला असल्याची माहिती डीएसकेंचे वकील अ‍ॅड. चिन्मय इनामदार यांनी दिली.

Web Title: DSK Case: Monthly Report for Forensic Auditors; Court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.