दुष्काळी परिस्थिती : चासकमानचे दुसरे आवर्तन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:18 AM2018-12-29T00:18:07+5:302018-12-29T00:18:31+5:30

खेड सह शिरुर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या हुतात्मा राजगुरु जलाशय चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल सत्तावन्न दिवसांनंतर म्हणजेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले.

Drought situation: Second cycle of Chasamachan is closed | दुष्काळी परिस्थिती : चासकमानचे दुसरे आवर्तन बंद

दुष्काळी परिस्थिती : चासकमानचे दुसरे आवर्तन बंद

Next

चासकमान : खेड सह शिरुर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या हुतात्मा राजगुरु जलाशय चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल सत्तावन्न दिवसांनंतर म्हणजेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले. धरणात सध्या ४४.१२% टक्के अर्थात ४.३० टीएमसी इतका पाणीसाठी राहिला आहे. त्यातील ३.३४ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी याच तारखेला (७.४४) टीएमसी शिल्लक होता.

चासकमान धरणाची पाणी पातळी निम्यावर आल्यामुळे धरणा अंतर्गत असणाऱ्या गावांत पाणी टंचाई निर्माण होऊन पिके संकटात आल्यामुळे चासकमान धरणातील पाणी राखीव ठेवण्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत धरण प्रशासनाने त्वरित बैठक घेऊन धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले दुसरे आवर्तन बंद केले.

चासकमान धरणा मधून खरिप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलै रोजी सोडण्यात होते. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेड सह शिरूर तालुक्याच्या शेतकºयांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या मागणी नुसार सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेले खरिप हंगामाचे पहिल्या आवर्तनाची गरज पुर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसानंतर अथर्तत १२ आँक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता पहिले आवर्तन बंद करण्यात होते. परंतु शिरुर तालुक्यातील शोतक-यांच्या मागणीमुळे २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कालव्या द्वारे पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु धरणाअंतर्गत पाणी टंचाई निर्माण होऊन भविष्यात दुष्काळी परिस्थिती होण्याचे चित्र असल्याने शुक्रवारी आवर्तन बंद करण्यात आले.

रब्बी हंगामातील शेतक-यांच्या मागणी नुसार जोडून सुरु असलेल्या अवर्तनाचा शेतकºयांना मोठा फायदा झाला. या जोड आवर्तनामुळे मेथी, कोथीबीर,फ्लावर, कोबी, मिरची, आदी पिकांचे उत्पादन वाढले आहे. शिरुर व खेड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेता मध्ये खोदून तयार करण्यात आलेली शेततळी भरुण ठेवल्याने उन्हाळ्यात होणाºया पाणी टंचाईवर मात करता .येणार आहे. शिवाय, रब्बी हंगामाचे आवर्तन सूरु असल्याने चास, कमान, मोहकल,कान्हेवाडी, कडधे, आखरवाडी, तिन्हेवाडी, सांडभोरवाडी, रेटवडी, आदी गावासह शिरुर तालुक्यातील कालव्या अंतर्गत असलेल्या अनेक गांवांतील पाणी पुरवठा करणाºया योजनेचा फायदा झाला. त्यामुळे येथील शेतक-यांनी धरण प्रशासन व अधिका-यांचे धन्यवाद व्यक्त केले.

धरण उशाशी कोरड घशाशी
चासकमान धरणामधून रब्बी हंगामाचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे धरणामधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. त्यामुळे धरणाअंतर्गत असलेल्या शेतकºयांना आपल्या पिके जगविण्यासाठी तारेवरची कसरत करून पाणी द्यावे लागत आहे . गावातील नळ पाणीपुरवठा योजनादेखील दोन सलगच्या आवर्तनामुळे संकटात आले आहे. त्यामुळे धरणाजवळील गावांची अवस्था धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी झाली आहे.

...अशी झाली पाण्याची घट
रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते. तेव्हा चासकमान धरणामध्ये ८४.१४ पाणीसाठा शिल्लक होता, तर पाणीपातळी ६४७.५८ मीटर आणि एकूण पाणीसाठा २०७.७३ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा १८०.५४ दलघमी इतका होता. सध्या धरणा मध्ये ४४.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीपातळी ६४१.३२ मीटर आहे एकुण पाणीसाठा १२१.८४ दलघमी तर उपयुक्त साठा ९४.६५ दलघमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी धरणामध्ये ४० टक्के साठा कमी शिल्लक आहे.

Web Title: Drought situation: Second cycle of Chasamachan is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.