सर परशुरामभाऊ महाविद्याालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय देव यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 07:37 PM2019-04-11T19:37:05+5:302019-04-11T19:37:43+5:30

ज्येष्ठ साहित्यिक  गो. नी. दांडेकर यांचे जावई आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ते वडील होत...

Dr. Parshurambhau college former Principal, Dr. Vijay Dev's death | सर परशुरामभाऊ महाविद्याालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय देव यांचे निधन

सर परशुरामभाऊ महाविद्याालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय देव यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यशास्त्राचे विद्याार्थीप्रिय प्राध्यापक, लेखक म्हणून डॉ देव परिचित

पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्याालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय प्रल्हाद देव (वय ७८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, दोन मुली, जावई आणि नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ साहित्यिक  गो. नी. दांडेकर यांचे जावई आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ते वडील होत. विजय देव यांच्या अंतिम इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
राज्यशास्त्राचे विद्याार्थीप्रिय प्राध्यापक, लेखक म्हणून डॉ देव परिचित होते. स. प. महाविद्याालयात राज्यशास्त्र विषयाचे ३५ वर्षे अध्यापन केले. दोन वर्षे प्राचार्यपद भूषवून ते निवृत्त झाले. १९६६ पासून ते स.प.महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन करत होते. राज्यशास्त्र विभागप्रमुख, पदव्युत्तर राज्यशास्त्र केंद्रप्रमुख, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संयोजक अशा विविध जबाबदा-या त्यांनी सांभाळल्या. पुणे विद्यापीठ तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्यांनी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, विद्याशाखेचे सदस्य, सिनेट सदस्य अशी विविध पदे भुषवली.
राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, दुर्गसंपदा अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केले. गोनीदांच्या विविध साहित्यकृतींच्या अभिवाचनाची संस्कृती त्यांनी रूजविली. गोनिदा दुर्गप्रेमी मंडळाचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. या मंडळातर्फे दरवर्षी दुर्ग साहित्य संमेलनासह दुर्ग जागरणाचे विविध उपक्रम त्यांनी राबविले. मृण्मयी प्रकाशन संस्थेचे ते संचालक होते. राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, विद्वत सभा, सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाच्या अधिसभेचे ते सदस्य होते.  
राजकीय सिध्दांत, राजकीय विचारप्रणाली आणि राजकीय समाजशास्त्र हे प्रा. देव यांच्या अध्यापनाचे आवडते विषय होते. कौटिल्य आणि मॅकियाव्हेली यांच्या राजकीय संकल्पनांचा अभ्यास करुन प्रा. देव यांनी १९८३ मध्ये पीएचडी पदवी संपादन केली. राजकीय विश्लेषण कोशामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. 

----------
विजय देव यांनी आयुष्यभर सरस्वतीची सेवा केली. सरस्वतीच्या ओंजळीतील फूल गळून पडले आहे. विद्येची संपत्ती दान करणाºया देव यांना विद्याार्थ्यांचे प्रेम मिळाले. त्यांचे हसतमुख असे दर्शन आता घडणार नाही.
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

Web Title: Dr. Parshurambhau college former Principal, Dr. Vijay Dev's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.