प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पत्नीसह दहा महिन्यांच्या बाळाला संपवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 02:15 PM2018-06-10T14:15:36+5:302018-06-10T14:15:36+5:30

पत्नीचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल असं दत्ताने आपल्या प्रेयसीला सांगितलं होतं.

double murder case in Pimpri chinchwad | प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पत्नीसह दहा महिन्यांच्या बाळाला संपवलं

प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पत्नीसह दहा महिन्यांच्या बाळाला संपवलं

Next

पिंपरी: प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या पत्नी आणि दहा महिन्यांच्या बाळाची हत्या करवून आणल्याचा प्रकार हिंजवडीजवळील नेरे भागात भागात घडला आहे. यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव अश्विनी तर बाळाचे नाव अनुज असे आहे. दत्ता भोंडवे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणात दत्तासह त्याची प्रेयसी व दोन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री नेरे येथे ही घटना घडली. सुरुवातीला दत्ताने आपल्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला करुन पत्नी-मुलाची हत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

३० वर्षीय दत्ता भोंडवेचे लग्नानंतरही एका महिलेशी प्रेमसंबंध होते. पत्नीचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल असं दत्ताने आपल्या प्रेयसीला सांगितलं होतं. यानंतर दोघांनी मिळून ५०-५० हजार रुपयांची सुपारी देत दत्ताची पत्नी आश्विनी व मुलगा अनुजच्या हत्येचा कट रचला. पत्नी आणि मुलासह सासुरवाडीवरुन परतत असताना दत्ता भोंडवेने पाणी पिण्याच्या बहाण्याने मुंबई-बंगळुरु महामार्गावर मोटार थांबवली. यावेळी दोन अज्ञात इसमांनी मोटारीत शिरुन आश्विनी भोंडवे यांच्या तोंडावर रुमाल ठेवत गाडी जांभे गावाच्या पुढे नेण्याची धमकी दिली. मोटर पुढे गेल्यानंतर मारेकऱ्यांनी दत्ताच्या मानेवर चाकू लावला. मारेकऱ्यांनी या दोघांकडील पैसे आणि दागिने चोरले. यानंतर त्यांनी दत्तावर चाकूने वार केले. त्यानंतर दोन्ही मारेकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने आश्विनीचा गळा आवळून खून केला. यावेळी गाडीत असलेला दहा महिन्याचा अनुज रडायला लागल्यामुळे, त्याला गप्प करण्यासाठी दोन्ही मारेकऱ्यांनी त्याचीही हत्या केली. 

दोन्ही मारेकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने आश्विनीचा गळा आवळून खून केला. यावेळी गाडीत असलेला दहा महिन्याचा अनुज रडायला लागल्यामुळे, त्याला गप्प करण्यासाठी दोन्ही मारेकऱ्यांनी त्याचीही हत्या केली. दोघांचीही हत्या केल्यानंतर दत्ताने गाडीतील रोखरक्कम चोरीला गेल्याचाही बनाव रचला. मात्र पोलिसी खाक्यापुढे या आरोपींचं काहीही चालू शकलं नाही. या प्रकरणी सध्या चारही आरोपी हिंजवडी पोलिसांच्या अटकेत आहेत

Web Title: double murder case in Pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.