Documentary, Adv. For Fearless Location Production Rama Sarode's Initiative | भयमुक्त स्थळनिर्मितीसाठी माहितीपट, अ‍ॅड. रमा सरोदे यांचा पुढाकार

पुणे -  कामानिमित्त स्त्री घराबाहेर पडली असली, तरी तिला एका सुरक्षित स्थळी भयमुक्त आणि दबावरहित वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे या विषयावर संवेदनशील, साधेपणाने पण ठामपणे विचार पोहोचविण्याची गरज आहे, या जाणिवेतून कार्यालय स्थळी स्त्रियांना सहन करावा लागणारा लैंगिक अत्याचार विविध उदाहरणांद्वारे छोट्या चित्रफितीतून दाखविण्यासाठी सामाजिक कायदेविषयक अभ्यासक अ‍ॅड. रमा सरोदे यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यालयीन स्थळी लिंगाधारित भेदभाव, विषमता नसावी हे सोप्या पद्धतीने सांगून स्त्री-पुरुषांना संवेदनशील करणारा माहितीपट निर्मित केला जाणार आहे.
महिलांच्या छळाच्या प्रश्नासाठी दाद कुठे मागायची? कार्यालयात अंतर्गत समिती आहे का नाही? याबाबतही महिला अनभिज्ञ आहेत. त्यामुळे जागतिक महिला दिनी रमा सरोदे यांनी छोट्या चित्रफितींमधून व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी घेतलेला पुढाकार हे नक्कीच सकारात्मक पाऊल आहे. याविषयीची माहिती देणारा व्हिडिओही
त्यांनी सोशल मीडियावरही प्रसारित केला आहे.

गेली १८ वर्षे मानवी हक्कांच्या विषयावर रमा सरोदे काम करीत आहेत. त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ. आज नोकरीनिमित्त स्त्रियांनी घराचा उंबरठा ओलांडला असला तरी कार्यालयीन स्थळी तिला सुरक्षित वातावरण मिळू शकलेले नाही.

अत्यंत सोपी भाषा : व्हिडीओ बेस मॉड्यूल टेÑनिंग बनविणार

१९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विशाखा समितीमार्फत मार्गदर्शक सूचनेनुसार कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळासंदर्भात निर्देश दिले होते. अनेक वर्षानंतर २०१३मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळासंदर्भातील कायदा अस्तित्वात आला.
कायद्याअंतर्गत प्रत्येक कामाच्या ठिकाणी एक अंतर्गत समिती असावी जेणेकरून महिलांवर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होऊ नये आणि झाल्यास तत्काळ निवारण मिळवून देणे.
यासाठी प्रतिबंधात्मक काम करण्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहेत; पण कुणाची वागणूक कुणासाठी लैंगिक छळ ठरेल, हे सांगता
येत नाही.

या केस सांभाळताना कायद्याची जी समज आली, त्या कामाचे कुठेतरी डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. याकरिता अत्यंत सोप्या भाषेत कायद्याचे ज्ञान देत व्हिडीओ बेस मॉड्यूल टेÑनिंग मॉड्यूल आम्ही तयार करीत आहोत.
कायद्याची भाषा क्लिष्ट न वाटता काय केस होतील आणि निवारण कसे केले, हा कायदा सोपा करून सांगण्यासाठी ही टेÑनिंग मॉड्यूल राज्यभरात पोहोचविणार आहोत.
यासाठी मायग्रोथ झोन एज्युकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्हिडीओ करण्यासाठी सहकार्य करीत असल्याचे रमा सरोदे यांनी सांगितले.

सामाजिक कायदेविषयक क्षेत्रात काम करताना आलेले विविध अनुभव स्त्री-पुरूष असा भेद मनात न ठेवता आणि पूर्वग्रहविरहित पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम कायद्याचा नेमका अर्थ सांगणाºया सहा व्हिडिओद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. कार्यालयीन स्थळी स्त्रियांवर होणाºया लैंगिक हिंसाचारासंदर्भात नेहमी विचारल्या जाणाºया प्रश्नांची उत्तरे महत्त्वाचे व्यापक प्रबोधन साधू शकतील.
- अ‍ॅड. रमा सरोदे,
सामाजिक कायदा अभ्यासक


Web Title:  Documentary, Adv. For Fearless Location Production Rama Sarode's Initiative
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.