२७ दिवसांच्या पाण्याचे करायचे काय? पुण्यासमोर संकट उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:30 AM2019-01-14T00:30:17+5:302019-01-14T00:32:45+5:30

गणित जुळून येईना : प्रकल्पात १५६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा what to do water for 27 days?

Do you want water for 27 days? Stand before the crisis in Pune | २७ दिवसांच्या पाण्याचे करायचे काय? पुण्यासमोर संकट उभे

२७ दिवसांच्या पाण्याचे करायचे काय? पुण्यासमोर संकट उभे

googlenewsNext

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा, पुणे महानगरपालिकेकडून उचलले जाणारे पाणी आणि येत्या १५ जुलैपर्यंत होणारा पाण्याचा वापर याचे गणित जुळून येत नाही. पुणे व परिसरातील नागरिकांसाठी पुढील १८३ दिवसांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करायचे आहे. मात्र, धरण प्रकल्पात १५६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांच्या २७ दिवसांच्या पाण्याचे करायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


फेब्रुवारी महिन्यात धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट पाणीकपातीचा निर्णय घेणार असल्याचे बोलते जात आहे. त्यामुळे येत्या मार्च महिन्यापर्यंत पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. परिणामी पुणे महापालिकेला मार्चपर्यंत दररोज १३५० एमएलडी (०.०४८ टीएमसी) मिळणार आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही जलसंपदा विभागाकडून येत्या १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यातील सध्या शिल्लक राहिलेले १८ दिवस, फेब्रुवारीचे २८ दिवस, मार्च महिन्याचे ३१, एप्रिलचे ३०, मे महिन्याचे ३१, जूनचे ३० आणि जुलै महिन्याचे १५ असे एकूण १८३ दिवस पाणी कसे पुरेल, याचा विचार जलसंपदा व पालिका प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे.


सध्या तरी पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला येत्या मार्च महिन्यापर्यंत म्हणजेच पुढील ७७ दिवस १३५० एमएलडी पाणी वापरण्यास मिळू शकते. या ७७ दिवसांत पालिकेकडून ३.६९ टीएमसी पाण्याचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर एप्रिल, मे, जून आणि १५ जुलैपर्यंतचे एकूण १०६ दिवस याच पद्धतीने पाण्याचा वापर सुरू राहिला तर धरणातील ५.०८ टीएमसी पाण्याचा वापर होईल. परिणामी १४ जानेवारी ते १५ जुलैपर्यंत पालिकेकडून ८.७७ टीएमसीएवढे पाणी वापरले जाईल.


खडकवासला धरण प्रकल्पात रविवारी (दि. १३) केवळ १७.०० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु, उन्हाळ्यात धरणातील सुमारे २ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पुढील काळात धरणातील केवळ १५ टीएमसी पाणीच वापरण्यास मिळणार आहे. परंतु, पुढील १८३ दिवसांसाठी पालिकेला ८.७७ टीएमसी पाणी आणि शेतीसाठी रब्बीला ३.५ आणि उन्हाळी आवर्तनासाठी ४ असे एकूण ७.५० टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे.


त्यामुळे प्राप्त परिस्थितीचा विचार करता सध्या एकूण १६.२८ टीएमसी पाण्याची गरज आहे. मात्र, धरणात केवळ १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही आपत्कालीन परिस्थितीसाठी धरणात १ ते १.५ दीड टीएमसी पाणी शिल्लक ठेवावे लागते. त्यामुळे हे पाणी कुठून येणार, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

कोणते २७ दिवस?
पुणेकरांचे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवले जाईल, असे गृहितक मानले तर १८३ दिवस ८.७७ टीएमसी पाणी लागेल. मात्र, शेतीसाठी ७.५० टीएमसी पाणी दिल्यानंतर पुणेकरांना १५६ दिवस पुरेल एवढेच ७.४८ टीएमसी पाणी धरणात शिल्लक राहते. त्यामुळे १८३ दिवसांतून १५६ दिवस वजा केले, तर २७ दिवस राहतात. त्यामुळे या २७ दिवसांसाठी पाणी कुठून आणायचे?

महत्त्वाचे मुद्दे :
च्धरण प्रकल्पातील रविवारचा (दि. १३) पाणीसाठा १७.०० टीएमसी
च्रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी लागणारे पाणी ७.५० टीएमसी
च्उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन सुमारे २ टीएमसी
च्१५ जुलैपर्यंतच्या १८३ दिवसांसाठी लागणारे पाणी ८.७७ टीएमसी
च्मागील वर्षाचा १३ जानेवारी रोजीचा पाणीसाठा २१.१३ टीएमसी
च्गेल्या वर्षापेक्षा यंदा
धरणात ४.१३ टीएमसी पाणीसाठा कमी


पाण्याचे नियोजन गरजेचे
जलसंपदा विभागाने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणे बांधली आहेत. त्यानुसार दरवर्षी शेतीसाठी आणि पिण्यासाठी किती पाणी दिले जावे, याचे नियोजन विभागातर्फे केले जाते. त्यामुळे शेतीच्या हिश्श्याचे पाणी पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी देता येणार नाही. पालिकेने उपलब्ध पाण्याचा विचार करूनच टाऊन प्लॅनिंग करणे अपेक्षित आहे. सध्या खडकवासला धरण प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे तत्काळ योग्य नियोजन केले पाहिजे. जानेवारीत दोन वेळ पाणी आणि एप्रिल, मे महिन्यात पाणीच नाही, याला नियोजन म्हणता येत नाही.
- सुरेश शिर्के, माजी सचिव, जलसंपदा विभाग, तथा अध्यक्ष, भारतीय जलसंपत्ती संस्था, पुणे केंद्र.

Web Title: Do you want water for 27 days? Stand before the crisis in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.