ठळक मुद्देवैद्यकीय अभ्यास करणारी मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड ठरली. डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करणारी मानुषी आता विश्वसुंदरी बनली आहेया क्षेत्रात येण्यासाठी साहजिकच फार प्रयत्न लागतात. काही तरुणी आपलं शिक्षण सांभाळून आपली आवड पुढे नेत असतात.पुण्यात अशा दोन सौंदर्यवती आहेत, ज्यांनी सुरुवातील करिअर म्हणून वेगळं क्षेत्र निवडलं पण कालांतराने त्यांनी सौंदर्यवतीचाही किताब पटकवला आहे. 

पुणे :  वैद्यकीय अभ्यास करणारी मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड ठरली. डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करणारी मानुषी आता विश्वसुंदरी बनली आहे. या क्षेत्रात येण्यासाठी साहजिकच फार प्रयत्न लागतात. आपण निवडलेलं करिअर सोडून एका वेगळ्याच करिअरमध्ये पदार्पण करणारी मानुषी एकटीच नाहीए. पुण्यात अशा दोन सौंदर्यवती आहेत, ज्यांनी सुरुवातील करिअर म्हणून वेगळं क्षेत्र निवडलं पण कालांतराने त्यांनी सौंदर्यवतीचाही किताब पटकवला आहे. 

निशा गुप्ता

पुण्यात राहणारी निशा गुप्ता हिला पुण्याची मानुषी छिल्लर असं म्हटलं जातंय. कारण फार्मसी क्षेत्रात करिअर घडवणारी निशा गुप्ता हिने अनेक सौंदर्यवतीच्या स्पर्धा जिंकल्या आहेत.  निशा गुप्ता आणि मानुषी छिल्लर यांच्यात एक साम्य आह की, या दोघीही वैद्यकिय क्षेत्रातून पुढे येत सौंदर्यवतींचा पुरस्कार मिळवला आहे. निशा गुप्ता शाळेत असल्यापासूनच विविध पर्सनॅलिटी ग्रुमिंग स्पर्धेत भाग घेत आलीय. त्यामुळे शाळा आणि कॉलेजमध्ये असताना तिला अनेक मिस पर्सनॅलिटीचे किताबही मिळाले आहेत. वयाच्या ३३ व्या वर्षी त्या इंडिया चार्मिंग फेस या स्पर्धेत सेकंड  रनरअप होत्या. करिअर, घर, मुलं हे सारं काही हॅन्डल करून निशा गुप्ता यांनी इथवर मजल मारली आहे. निशा सध्या पुण्यातील फार्मा आयटी फर्म इथं काम करतात. 

मानुषी छिल्लरविषयक बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

पर्णिता तांदुळवाडकर

सीए व्हायचं म्हणून त्यादिशेने वाटचाल करणाऱ्या पर्णिता थेट मिसेस इंडिया बनल्या. लवकर लग्न झाल्याने पर्णिता यांना अभ्यासाकडे लक्ष देता येत नव्हतं. अभ्यास सुरू असताना त्यांना मुलगा झाला. बाळंतपणामुळे त्यांचं वजनही वाढलं होतं. वजन वाढल्याने त्यांच्यात थोडं नैराश्यही आलं होतं. पण त्यांना यातून बाहेर पडायचं होतं. त्यामुळे त्यांनी जीम करायला सुरुवात केली. जीममुळे त्यांच्यात बराच बदल झाला. हा फरक त्यांच्या मैत्रिणीला जाणवू लागला. त्यामुळे त्यांच्या मैत्रिणीने त्यांना मिसेस इंडियाच्या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आग्रह केला. पर्णिता तांदुळवाडकर मिसेस इंडियाच्या स्पर्धेत यशस्वी ठरल्या. मिसेस इंडियाचा किताब मिळाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाह्यलं नाही. महिला वयाच्या तिशीनंतरही सौंदर्यवतीचा किताब मिळवू शकतात हेच त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. सीएपासून सुरू झालेलं त्यांचं करिअर लग्नानंतर मिसेस इंडियाच्या किताबामुळे पुर्णपणे बदलून गेलं. आपल्याला आलेल्या अडचणी इतरांना येऊ नये आणि आल्याच तरी त्यांना त्यातून बाहेर काढता यावं यासाठी त्यांनी उचलेलं पाऊल फार मोलाचं आहे. दुसर्‍यांच्या आयुष्यात आलेलं दुःख आपण आपल्या कलेने हलकं केलं तर आपल्यालाही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला मिळतं, म्हणूनच या क्षेत्रात आल्यानंतर मी पूर्वीपेक्षाही फार आनंदी आहे असं पर्णिता अभिमानाने सांगतात.

आणखी वाचा - मानुषी छिल्लरसारखी फिगर हवीये? -हे वाचा


Web Title: Do you know this Manushi Chillar of Pune?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.