सायकल शेअरिंगचे भवितव्य उद्या, महापालिका सर्वसाधारण सभा, आरोग्य उपविधीवरही चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:35 AM2017-12-13T03:35:29+5:302017-12-13T03:35:37+5:30

स्मार्ट सिटी कंपनीची सायकल शेअरिंग योजना त्यांच्या विशेष क्षेत्रात सुरू झाली, आता संपूर्ण शहरातील सायकल शेअरिंग योजनेचे भवितव्य गुरुवारी (दि. १४) होणा-या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी आरोग्य उपविधीमध्ये केलेल्या नव्या नियमांवरही या वेळी चर्चा होणार आहे.

Discussion on the future of cycle sharing tomorrow, municipal general meeting, health subdivision | सायकल शेअरिंगचे भवितव्य उद्या, महापालिका सर्वसाधारण सभा, आरोग्य उपविधीवरही चर्चा

सायकल शेअरिंगचे भवितव्य उद्या, महापालिका सर्वसाधारण सभा, आरोग्य उपविधीवरही चर्चा

Next

पुणे : स्मार्ट सिटी कंपनीची सायकल शेअरिंग योजना त्यांच्या विशेष क्षेत्रात सुरू झाली, आता संपूर्ण शहरातील सायकल शेअरिंग योजनेचे भवितव्य गुरुवारी (दि. १४) होणा-या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी आरोग्य उपविधीमध्ये केलेल्या नव्या नियमांवरही या वेळी चर्चा होणार आहे.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार शहरात सायकल शेअरिंग योजना राबवण्यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी खासगी सल्लागार कंपनीकडून याबाबतचा एक सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेतला आहे. त्यानुसार शहरात १ लाख सायकली घेण्यात येणार असून, त्यासाठी ५३१ किलोमीटरचे सायकल ट्रॅक शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये तयार करण्यात येणार आहेत. त्यातही बरेच वैविध्य असेल. काही हजार सायकल स्थानकेही असतील. भाडेतत्त्वावर सायकल मिळेल, नाममात्र शुल्क असेल. सायकल एका स्थानकावरून घेऊन दुसºया स्थानकावर जमा करता येईल, अशा अनेक गोष्टी या अहवालात आहेत. सर्व सायकली अत्याधुनिक असणार आहेत व त्यांच्या वापराला प्रोत्साहन मिळावे यासाठी योजनाही राबविण्यात येतील.
दोन आठवड्यांपूर्वी या व आरोग्य उपविधीच्या योजनांना मंजुरी घेण्यासाठी म्हणून महापालिकेची विशेष सर्वसाधारण योजना आयोजित करण्यात आली होती. त्यात हे विषय मंजूर व्हावेत, अशी आयुक्तांची आग्रही भूमिका होती. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी ती मान्यही केली होती, मात्र सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व आयुक्त यांचे काही नगरसेवकांच्या कामांना मंजुरी देण्यावरून बिनसले व त्याचा परिणाम म्हणून ही विशेष सभा अवघ्या एका मिनिटात तहकूब करण्यात आली. आता ती १४ डिसेंबरला (गुरुवारी) दुपारी ३ वाजता होणार आहे.
या दोन्ही विषयांचे काय करायचे, यावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक बुधवारी (दि. १३) दुपारी ४ वाजता महापौर निवासस्थानी होत आहे. सर्व नगरसेवकांना त्यासाठी बोलावण्यात आले आहे. पक्ष संघटनेचे पदाधिकारीही या वेळी उपस्थित असतील. त्यात प्रशासनाच्या वतीने या दोन्ही विषयांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सदस्यांना ज्या शंका असतील, त्या त्यांनी प्रशासनाला विचाराव्यात, असे सांगण्यात आले आहे. सायकल शेअरिंग योजनेबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांना सकारात्मक विचार करण्यास सांगितले आहे.

- आरोग्य उपविधीमध्ये कचरा इतस्तत: फेकल्यानंतर करायच्या दंडामध्ये वाढ, दुसºयांदा तोच गुन्हा केल्यावर त्यामध्ये वाढ व नंतर खटला दाखल करणे, असे काही नवे नियम करण्यात आले आहेत. याही विषयाचे सादरीकरण बुधवारच्या बैठकीत होईल, मात्र कचरा करणाºयांना वचक बसावा, यासाठी हा विषय आहे तसा मंजूर करण्यात येणार आहे.

Web Title: Discussion on the future of cycle sharing tomorrow, municipal general meeting, health subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे