मर्यादा ओळखून शहर व्यवस्थापन : सुलक्षणा महाजन : पर्यावरणप्रश्नी ‘अ‍ॅलर्ट’चा सिटी डॉयलॉग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:36 PM2017-11-27T12:36:14+5:302017-11-27T12:43:38+5:30

अ‍ॅलर्टच्या (असोसिएशन फॉर लीडरशिप एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग) वतीने ‘सीटी डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर व उपाययोजनांवर पुण्यात व्यापक चर्चा घडली़.

discussion on Environmental issue, organize by alert pune | मर्यादा ओळखून शहर व्यवस्थापन : सुलक्षणा महाजन : पर्यावरणप्रश्नी ‘अ‍ॅलर्ट’चा सिटी डॉयलॉग

मर्यादा ओळखून शहर व्यवस्थापन : सुलक्षणा महाजन : पर्यावरणप्रश्नी ‘अ‍ॅलर्ट’चा सिटी डॉयलॉग

Next
ठळक मुद्दे‘अ‍ॅलर्ट’च्या वतीने ‘सीटी डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर चर्चावाढत्या प्रदूषणाचा धोका; या पार्श्वभूमीवर आपण जागरूक राहायला हवे : वंदना चव्हाण

पुणे : शहरीकरण अनिवार्य असल्याने शहर व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायला हवे. निसर्गनियम, पर्यावरणीय मर्यादा समजावून घेऊन शहर व्यवस्थापन केले पाहिजे. लोकानुनय करण्यासाठी विनाशकारी निर्णय लोकप्रतिनिधींनी घेता कामा नये, असे मत नगररचनातज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले़ 
शहरातील वाढते प्रदूषण हा अतिशय गंभीर विषय झालेला आहे. दिल्लीनंतर पुण्याचा देखील नंबर लागू शकतो. या पार्श्वभूमीवर अ‍ॅलर्टच्या (असोसिएशन फॉर लीडरशिप एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग) वतीने ‘सीटी डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर व उपाययोजनांवर व्यापक चर्चा घडली़ अध्यक्षस्थानी  अ‍ॅलर्टच्या संस्थापक खासदार वंदना चव्हाण होत्या़ या चर्चासत्रात सुलक्षणा महाजन यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. नागरीतज्ज्ञ, विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि वक्ते या चर्चासत्रात सहभागी झाले. 
अनिता बेनिंजर म्हणाल्या, शहरीकरणाची व्याख्या बदलणे आवश्यक आहे व आपल्या शहराबद्दल आपुलकी बाळगूनच नियोजन केले पाहिजे. वनराई, मोकळ्या जागा, नद्या जपल्या पाहिजेत़ 
सुजित पटवर्धन म्हणाले, की खासगी गाड्यांसाठी फ्लायओव्हर आणि रस्ते बांधले तर वाहने आणखी वाढतात आणि पुन्हा रस्ते, फ्लायओव्हर बांधावे लागतात. म्हणून सार्वजनिक वाहतूक मोफत केली तरी एकूण दृष्टिकोनातून फायद्याची ठरेल़
देशभ्रतार म्हणाल्या, शहर व्यवस्थापनाच्या निकषांवरच पुणे पालिका हद्दीत कामे सुरू आहेत. नागरिकांच्या, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार काही बदल होत असले तरी ती लोकशाहीची प्रक्रिया आहे . 
कचरा जाळणाºयांवर कारवाई केली जाईल, असे सुरेश जगताप यांनी सांगितले. हवेतील धूलिकणांचे प्रमाण धोक्याच्या पातळीपेक्षा वाढत आहे, असे पालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी सांगितले. 
दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाच्या बातम्यांनी संपूर्ण देश हवालदिल झाला आहे. तसेच आता पुण्यात देखील वाढत्या प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण जागरूक राहायला हवे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व संबंधितांनी योग्य दिशेने आणि पुरेसे प्रयत्न करीत आहेत की नाही, याविषयी माहिती घेण्यासाठी  या महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, असे वंदना चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले . 
‘सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन’, ‘परिसर’, ‘सजग नागरिक मंच’, ‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड एॅक्टिव्हिटीज’, ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड एक्टिव्हिटीज’, ‘नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज’, ‘सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्ह’, ‘वनराई’, ‘लायन्स क्लब आॅफ इंटरनॅशनल’ या संस्था सहभागी झाल्या़
कार्यक्रमाला विवेक वेलणकर, पालिकेचे विरोधी नेते चेतन तुपे, नगरसेवक नंदा लोणकर, नगरसेवक बाबूराव चांदेरे, नगरसेवक महेंद्र पाठारे, नगरसेवक योगेश ससाणे, रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते़
 

Web Title: discussion on Environmental issue, organize by alert pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.