ई-बसमध्येही प्रवाशांकडून घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:25 AM2019-02-24T00:25:24+5:302019-02-24T00:25:40+5:30

शहरातील रस्त्यांवर पहिल्यांदाच वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस धावू लागल्याने सगळ्यांनाच अपु्रप वाटत आहे. प्रवाशांकडूनही या बसला चांगला प्रतिसाद मिळतोय.

Dirt from passengers even in e-bus | ई-बसमध्येही प्रवाशांकडून घाण

ई-बसमध्येही प्रवाशांकडून घाण

Next

पुणे : शहरातील रस्त्यांवर पहिल्यांदाच वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस धावू लागल्याने सगळ्यांनाच अपु्रप वाटत आहे. प्रवाशांकडूनही या बसला चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकदा गर्दी ओव्हरफ्लो होत आहे. सध्या केवळ सातच मार्गांवर बसचे संचलन सुरू आहे. पुढील काही महिन्यांत आणखी १२५ बस बस बीआरटी मार्गांवर धावू लागतील. पण, सध्या बसला होणारी गर्दी, बीआरटी मार्गांची दुरवस्था, काही बेशिस्त चालक, वाहनांची प्रचंड कोंडी या कारणांमुळे ई-बसही खिळखिळ्या होण्यास वेळ लागणार नाही, असे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील काही अधिकारीच बोलत आहेत.


पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सात मार्गांवर ई-बस धावत आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर या बस दाखल झाल्याने प्रवाशांकडून या एसी बसचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे संबंधित मार्गावरील अनेक प्रवासी या बसमध्ये बसण्यासाठी उत्सुक आहेत. तर नेहमी रिक्षाने जाणाऱ्यांची पावलेही ई-बस पाहून थबकत आहेत. ही ‘स्मार्ट’ सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. पुढील दोन महिन्यांत आणखी १२५ ई-बस येण्यास सुरुवात होईल. या १२ मीटर लांबीच्या बस बीआरटी मार्गांवर सोडण्याचे नियोजन आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात निम्म्यांहून अधिक बसचे वयोमान संपल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या मनात या बसबाबत नाराजी आहे. हीच स्थिती ई-बसचीही होण्याची भीती काही अधिकारी व्यक्त करीत आहेत.


अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार, नऊ मीटर लांबीच्या ई-बसमध्ये ३१ तर १२ मीटर बसमध्ये सुमारे ५१ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आहे. सध्याच्या पीएमपीच्या जुन्या बसमधून ७० ते १०० प्रवासी दररोज प्रवास करतात. बसची वारंवारिता व संख्या पाहता हीच अवस्था ई-बसचीही होऊ लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याने ई-बसची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. एसीच्या यंत्रणेवरही ताण पडेल. त्यामुळे बॅटरीच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. अर्थात नवीन बसमुळे लगेचच परिणाम दिसून येणार नाही. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बहुतेक बीआरटी मार्गांची सध्याची स्थिती खूपच दयनीय आहे.

काही बेशिस्त प्रवाशांकडून या बसमध्येही थुंकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याबाबत प्रशासनाकडे चालक व वाहकांच्या तक्रारी आल्या आहेत. थुंकल्यामुळे बस खराब होऊन इतर प्रवाशांनाही त्रास होतो. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करतात. पण प्रशासन हतबल आहे. संबंधितांना शोधणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


अनेक चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. भरधाव वेगात बस नेण्याचे प्रकार सातत्याने घडतात. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अशा अपघातांमुळे ई-बसचे मोठे नुकसान होऊ शकते. ही एक बस सुमारे सव्वा कोटी रुपयांची आहे. त्यामुळे देखभाल-दुरूस्तीचा खर्चही मोठा आहे. संबंधित कंपनीच हे काम करणार असल्याने पीएमपीवर भार पडणार नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Dirt from passengers even in e-bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.