आता थकबाकीदार वीज ग्राहकांना मिळणार डिजिटल नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 09:13 PM2018-09-24T21:13:53+5:302018-09-24T21:18:22+5:30

आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे.

Digital notice will now get diligence of power to consumers | आता थकबाकीदार वीज ग्राहकांना मिळणार डिजिटल नोटीस

आता थकबाकीदार वीज ग्राहकांना मिळणार डिजिटल नोटीस

Next
ठळक मुद्देथकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी डिजिटल मोडनुसार नोटीस पाठविण्यास परवानगी महावितरणने २ कोटी ५ लाख ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी

पुणे : थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी त्यांना कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे नोटीस न देता वीज पुरवठा खंडित केला,असा दावा थकबाकीदारांना या पुढील काळात करता येणार नाही.
महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदर वाढ प्रस्ताव क्रमांक १९५/२०१७ च्या निकालानुसार आयोगाने महावितरणला थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी डिजिटल मोडनुसार नोटीस पाठविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे डिजिटल नोटीस कायदेशीर ठरविण्यात आली आहे. महावितरणने मागील कांही वषापार्सून ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे. महावितरणने २ कोटी ५ लाख ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली  असून त्यानुसार ग्राहकांना वीजपुरवठा व विजविषयक विविध बाबींची माहिती महावितरणतर्फे देण्यात येत आहे.

Web Title: Digital notice will now get diligence of power to consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.