विकास आराखडा अंतिम टप्प्यात - नवल किशोर राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:15 AM2019-04-06T00:15:23+5:302019-04-06T00:15:29+5:30

नवल किशोर राम : श्रीक्षेत्र वढू बुद्रुकच्या समाधिस्थळाला भेट देऊन शंभूराजेंना अभिवादन

Development Plan Final Stage - Naval Kishor Ram | विकास आराखडा अंतिम टप्प्यात - नवल किशोर राम

विकास आराखडा अंतिम टप्प्यात - नवल किशोर राम

Next

कोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ हे राष्ट्रीय स्मारक असून, शंभूछत्रपतींच्या प्रेरणादायी इतिहासातून समाजातील प्रत्येक स्तरातील तरुणांनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर
राम यांनी सांगीतले. शंभूराजांच्या स्मारक परिसराचा विकास आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार करून त्यास मान्यताही देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत वढू हे देशात आदर्श प्रेरणास्थान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज यांच्या ३३० वा बलिदानस्मरण दिन आज दि.५ एप्रिल रोजी झाला. सकाळी शासकीय पूजा जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, डॉ. जयंत मिना, अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक
सदाशिव शेलार, भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी संदीप जठार, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पंचायत समिती सदस्या सविता पºहाड, सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमाकांत
शिवले, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, साहेबराव भंडारे, जिल्हा बँकेच्या संचालक निवृत्ती गवारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष
शिवले, सचिन भंडारे, नवनाथ गुंडाळ, संजय शिवले, संभाजी भंडारे, सुनीता भंडारे, निर्मला भंडारे, निर्मला आरगडे, सोसायटीचे अध्यक्ष
विश्वास शिवले, माजी अध्यक्ष संजय शिवले, सचिन शिवले, ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, आदी उपस्थित होते.

शंभूराजांच्या समाधीची शासकीय पूजा केल्यानंतर उपस्थितांनी शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पूजा केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय पूजेस आलेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांच्या वतीने शंभुप्रतिमा देऊन सन्मानीत करण्यात आले.


वढू बुद्रुक येथे शंभूराजांची समाधी असल्याने या परिसराचे मोठे महत्त्व आहे. या परिसराचा विकास करतानाच शंभूछत्रपतींनी ज्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेत सुराज्य निर्माण केले त्याच इतिहासातून प्रेरणा घेत आपणही समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन परिसराचा विकास करण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.
- नवल किशोर राम,
जिल्हाधिकारी, पुणे

Web Title: Development Plan Final Stage - Naval Kishor Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.