detection with Convection necessary : Sanjay Kumar | डिटेक्शनबरोबरच कन्व्हिक्शन हवे : संजयकुमार
डिटेक्शनबरोबरच कन्व्हिक्शन हवे : संजयकुमार

ठळक मुद्देसेच चेन्नई येथे पार पडलेल्या पोलीस ड्युटी मिटमध्ये महाराष्ट्राकडून पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

पुणे : राज्यात २००९ मध्ये गुन्ह्यात शिक्षा लागण्याचे प्रमाण केवळ ८़१ टक्के होते़. ते आता ३४ टक्क्यांवर गेले आहे़ हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा आवश्यकता आहे़. त्यासाठी शासनाने दिलेल्या साधनसामुग्रीचा वापर योग्य प्रकारे केल्यास शिक्षा लागण्याचे प्रमाण वाढेल़ . डिटेक्शनबरोबरच कन्व्हीक्शनही वाढण्याची गरज आहे़, असे मत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी व्यक्त केले़. 
राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत राज्यात झालेल्या गुन्ह्यांमध्ये उत्कृष्ट तपास करणाऱ्या तपास पथकाला दर महिन्याला गौरविले जाते़.आॅगस्ट २०१६ ते एप्रिल २०१७ दरम्यान उत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार प्राप्त गुन्ह्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली़ .तसेच चेन्नई येथे पार पडलेल्या पोलीस ड्युटी मिटमध्ये महाराष्ट्राकडून पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला़ .या कार्यक्रमात ते बोलत होते़ अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल रामानंद, उपमहानिरीक्षक डॉ. जय जाधव, पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यावेळी उपस्थित होत्या.  
संजय कुमार म्हणाले, पोलीस अधिकारी, कर्मचारी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करतात़.  त्यादृष्टीने तपास अधिकारी, दोषारोपपत्र, व कोर्ट हवालदार यांची महत्वाची भूमिका आहे़. या सर्व गोष्टीचा विचार केला तर शिक्षेचे प्रमाण वाढू शकते़. दरोड्यामध्ये शिक्षेचे प्रमाण १५ ते २० टक्के होते. ते आता ४२ टक्क्यांवर गेले आहे़. खुन प्रकरणातील शिक्षेचे प्रमाण १५ होते ते ३० टक्के झाले आहे़. ते ५० टक्क्यांवर गेले पाहिजे़. प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक लॅब, सायबर लॅबची सुविधा देण्यात आली आहे़. शासनाने पुरविलेल्या साधन सामग्रीचा तपास करताना कसा वापर करतो, यावर शिक्षेचे प्रमाण वाढेल़ .यावेळी राज्यभरातील विविध विभागातील १५ गंभीर गुन्ह्यांचा कौशल्यपूर्वक तपास करुन गुन्हेगारांना शिक्षा होण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले़. पुण्यातील गाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाया खुशबु मिश्रा या तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिचा खुन केल्याच्या गुन्ह्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती़. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेषराव सूर्यवंशी व त्यांच्या पथकाचा सन्मान करण्यात आला़. तसेच दत्तवाडी पोलीस ठाण्यातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती़. तत्कालीन पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड व त्यांचा पथकाचा सन्मान करण्यात आला़ .तसेच मुंबईतील प्रिती राठी अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, बिडकीन पोलीस ठाणे, औरंगाबाद ग्रामीण येथील गुन्ह्यामध्ये ११ अकरा आरोपींना मोक्का अंतर्गत शिक्षा, सीआयडीने तपास केलल्या वेगुर्ला पोलीस ठाण्यातील दुहेरी हत्याकांड, मानपाडा पोलीस ठाण्याची पिटा केस, नांदेड विमानतळ पोलीस ठाण्यातील खुन, मुंब्रा पोलीस ठाण्यातील २०१२ मधील खुन, उदगीर शहर पोलीस ठाण्यातील हुंडा बळी, किनगाव पोलीस ठाण्यातील २०१४ मधील लैगिंक अत्याचार करुन जाळून मारण्याचा प्रयत्न, वाडा पोलीस ठाण्यातील खुनात फाशीची शिक्षा, मुंब्रा पोलीस ठाण्यातील २०१२ मधील दुहेरी खुन, अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यातील २०१३ मधील खुन प्रकरण, नांदेडमधील मरखेल पोलीस ठाण्यातील २०१६ मधील लैंगिक अत्याचार प्रकरण, हिंगोलीतील कळमनुरी पोलीस ठाण्यातील अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करुन खुन अशा विविध गुन्ह्यात शिक्षा होण्यास प्रयत्न करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला़. 


Web Title: detection with Convection necessary : Sanjay Kumar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.