फटाक्यांची मागणी घटली ; सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय अाणि जनजागृतीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:56 PM2018-11-07T17:56:15+5:302018-11-07T17:58:57+5:30

सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय अाणि वेळाेवेळी करण्यात येणारी जनजागृती यांमुळे फटाक्यांची विक्रीत यंदा कमालीची घट झाली अाहे.

Demand for crackers declined; The decision of the Supreme Court and the result of public awareness | फटाक्यांची मागणी घटली ; सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय अाणि जनजागृतीचा परिणाम

फटाक्यांची मागणी घटली ; सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय अाणि जनजागृतीचा परिणाम

googlenewsNext

पुणे : दिवाळी म्हंटलं की सर्वत्र फटाक्यांची अाताषबाजी, फटाक्यांचा माेठा अावाज असेच काहीचे चित्र सर्वत्र भारतात पाहायला मिळते. परंतु सर्वाेच्च न्यायलयाने फटाके फाेडण्याच्या वेळेवर घातलेल्या निर्बंघामुळे तसेच नागरिकांमध्ये हाेणाऱ्या जागृतीमुळे यंदा फटाक्यांच्या विक्रीत चांगलीच घट झाली अाहे. साधारण 30 ते 40 टक्क्यांची घट फटाकाविक्रीवर झाल्याचे यंदाचे चित्र अाहे. 

    सर्वाेच्च न्यायालयाने फटाके उडविण्याच्या वेळेवर बंदी घातली अाहे. त्यानुसार अाता कधीही फटाके फाेडता येणार नाहीत. रात्री 8 ते 10 याच वेळात नागरिकांना फटाके फाेडता येणार अाहेत. परिणामी यंदा सर्वत्र फटाके फाेडण्याचे प्रमाण कमालीचे कमी झाल्याचे चित्र अाहे. दरवर्षी दिवळीत दिसणारी अाताषबाजी यंदा फारशी दिसत नसल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर फटाक्यांचा स्टाॅलवर सुद्धा फारशी गर्दी नाही. अनेक पर्यावरणवादी संस्था, शाळा, महाविद्यालांमधून फटाक्यांमुळे हाेणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने लहान मुले व तरुणही फटाके फाेडण्यापासून परावृत्त हाेत अाहेत. त्यामुळे दिवाळीत हाेणाऱ्या प्रदूषणातही कमालीची घट झाली अाहे. त्याचबराेबर यंदा बाजारात कमी अावाजाचे तसेच शाेभेचे फटाके माेठ्याप्रमाणावर दाखल झाले अाहेत. माेठ्या अावाजाच्या फटाक्यामुळे लहान मुलांना, प्राण्यांना त्रास हाेत असल्याने शाेभेच्या फटाक्यांचे उत्पादन वाढले अाहे. जीएसटी व फटाक्यांच्या वाढलेल्या किंमती यांमुळे देखील फटाक्याच्या विक्रीत घट झाली अाहे. त्याचबराेबर बाजारात असलेल्या मंदीमुळे फटाक्यांची अावकही कमी झाली अाहे.
 
    याबाबत बाेलताना शाेभेचे दारु उत्पादक खरेदी- विक्री सहकारी संघटनेचे चेअरमन संताेष बाेरा म्हणाले, या वर्षी फटाक्याचे उत्पादन तसेच अायात कमी झाली अाहे. फटाक्यांची मागणी घटल्याने अायातही कमी झाली अाहे. त्याचबराेबर सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही फटका फटका विक्रीला बसला अाहे. यंदा 30 ते 40 टक्क्यांनी विक्रीत घट झाली अाहे. फटाक्यांमुळे प्रदूषण हाेते हे कारण अनेकदा पुढे केले जाते. परंतु दरराेज सिगारेट तसेच एसी, वाहने यांमधून हाेणाऱ्या प्रदूषणाबाबत फारशे बाेलले जात नाही. दिवाळी हा लहान मुलांचा सण अाहे. फटाके फाेडून लहान मुले अानंद साजरा करत असतात. प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन फटाक्यांच्या धूरातून घातक अाजार हाेणार नाही याकडेही फटाका उत्पादक कंपन्या लक्ष देत अाहेत.

Web Title: Demand for crackers declined; The decision of the Supreme Court and the result of public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.