भाडेकरूची माहिती देण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:42 AM2019-01-10T00:42:40+5:302019-01-10T00:42:59+5:30

घरमालकांचे दुर्लक्ष : पोलिस ठाण्यात नोंद आवश्यक

Delay in giving details of tenant information | भाडेकरूची माहिती देण्यास दिरंगाई

भाडेकरूची माहिती देण्यास दिरंगाई

Next

कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर म्हणजे पुणे शहरापासून जवळचा जलद गतीने विकसित होत असलेला भाग; जिथे व्यवसाय-नोकरीसाठी दुरदुरून माणसे वास्तव्यास येत आहेत. यामुळे या परिसरात घर भाड्याने देण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घरमालकाने घर भाड्याने देताना भाडेकरूची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करणे बंधनकारक असताना घरमालकांचे या नोंदणीकडे साफ दुर्लक्ष होत आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध कारणांनी स्थायिक होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. वास्तव्यास आल्यानंतर भाड्याने घर घेऊन राहणाºयांचे प्रमाण यामुळेच वाढलेले आहे. नवीन वसाहतीमध्ये भाड्याने घर उपलब्ध होऊ लागल्याने भाडेकरू घर भाड्याने घेऊन स्थिरावत आहेत. घर भाड्याने घेताना प्रत्येकाने आपली नोंद पोलीस ठाण्यात करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत निरुत्साह दिसून येत आहे.

समाजकंटक, दहशतवादी हे कुठेही लपून राहू शकतात. अशी समाजविघातक मंडळी ज्या अपार्टमेंट, बंगला किंवा चाळींमध्ये भाडेकरू म्हणून वास्तव्यास असतात, त्या परिसरातील त्यांचा वावर कोणाला संशय येणार नाही, असा असतो. परिसरातील रहिवाशांना त्यांच्याकडून कोणताही त्रास नसल्याने तेही अशा व्यक्तींविरुद्ध तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. परंतु, घरमालकांनी भाडेकरू ठेवताना अशा सर्वच बाबींची दक्षता बाळगण्याची गरज आहे. भाडेकरू ठेवताना त्याचे मूळ गाव, व्यवसाय, कुटुंबातील सदस्यांची संख्या, नातेवाईक, फोन नंबर, अशी सर्व माहिती घरमालकाने स्वत:कडे तसेच अपार्टमेंटच्या अध्यक्षांकडे आणि पोलिसांकडे देण्याची आवश्यकता आहे. पोलिसांकडून भाडेकरूंची संपूर्ण माहिती ठाण्यात देण्याचे आवाहन यापूर्वी वारंवार करण्यात आलेले आहे. तरीही, बहुतेक घरमालकांनी भाडेकरूंची माहिती कळविलेली नसल्याचे दिसून येते.

घरमालकांमध्ये निरुत्साह
घर भाड्याने देताना घरमालकाने भाडेकरूविषयी संपूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे. मात्र, घरमालक याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांची नोंदणी करण्यातही त्यांना
फारसा रस नसतो.

भाडेकरूविषयी माहिती देण्याचा फॉर्म पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध आहे. तरी, पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येत आहे, की लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत असणाºया घरमालकांनी लवकरात लवकर आपल्या भाडेकरूंविषयीची माहिती पोलीस ठाण्यामध्ये द्यावी. या प्रकरणी दोषी आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल.
- क्रांतिकुमार पाटील, पोलीस निरीक्षक,
लोणी काळभोर पोलीस ठाणे

Web Title: Delay in giving details of tenant information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे