सव्वालाख थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडीत; महावितरणची पुण्यात धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 02:36 PM2017-12-06T14:36:08+5:302017-12-06T14:39:41+5:30

महावितरणच्या थकबाकीदारांचा आकडा कमी करण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून तब्बल १ लाख १४ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

defaulters electricity supply cut; MSEB campaign in Pune | सव्वालाख थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडीत; महावितरणची पुण्यात धडक मोहीम

सव्वालाख थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडीत; महावितरणची पुण्यात धडक मोहीम

Next
ठळक मुद्देतब्बल १ लाख १४ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीतवीजपुरवठा खंडित केल्यानंतरही अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असल्यास फौजदारी कारवाई

पुणे : महावितरणच्या थकबाकीदारांचा आकडा कमी करण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून गेल्या महिन्याभरात पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड या तालुक्यातील तब्बल १ लाख १४ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या वीजग्राहकांकडे ६९ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
महावितरणने थकबाकी वसूल करण्यासाठी नोव्हेंबरपासून ‘शून्य थकबाकी’ ही मोहीम हाती घेतली आहे. येत्या दहा दिवसात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. महावितरणकडून वारंवार आवाहन करुनही मोठ्या प्रमाणावर थकबाकीदार बिलांचा भरणाच करीत नसल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबरमध्ये पुणे शहरातील ६६ हजार ९८ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा २८ कोटी ३४ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर पिंपरी चिंचवड शहरातील १६ हजार ८८२ थकबाकीदारांचा १४ कोटी १५ लाख तसेच मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील ३१ हजार ८७९ ग्राहकांचा २६ कोटी ७१ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
वीजपुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकांना थकीत बिलांचा भरणा करण्यासोबतच, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागत आहे. हा त्रास टाळण्यासाठी थकीत बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. थकबाकीमुळे तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे.

Web Title: defaulters electricity supply cut; MSEB campaign in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.