म्हणींमधून उलगडणार नृत्याविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:35 PM2018-05-23T13:35:04+5:302018-05-23T13:35:04+5:30

संस्कृतीदर्शक म्हणींमधून प्रांताचे, भाषेचे वैशिष्टये प्रतीत होत असते. याच म्हणींवर आधारित नृत्यसंरचनेची संकल्पना आता प्रत्यक्षात साकारत आहे.

Dance innovation will be reveal into phrases | म्हणींमधून उलगडणार नृत्याविष्कार

म्हणींमधून उलगडणार नृत्याविष्कार

Next
ठळक मुद्दे‘मॅडम मेनका मूव्हमेंट’ ही अभिवन संकल्पना शुक्रवारपासून (२५ मे) दोन दिवसांच्या नृत्याविष्कारातून उलगडणार सहा कलाकार प्रत्येकी २५ मिनिटांच्या पाच नृत्यसंरचनांचे सादरीकरण करणार

पुणे : विविध भाषांतील म्हणी संस्कृतीचा, लोककलेचा आरसा असतात. संस्कृतीदर्शक म्हणींमधून प्रांताचे, भाषेचे वैशिष्टये प्रतीत होत असते. याच म्हणींवर आधारित नृत्यसंरचनेची संकल्पना आता प्रत्यक्षात साकारत आहे. या अंतर्गत विविध भाषांतील आणि वेगवेगळ्या प्रांतातील पाच नृत्यरचना सादर केल्या जाणार आहेत. प्रत्येक नृत्याविष्कारानंतर त्यावर सामूहिक चर्चा होणार आहे. नादरूप आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे ‘मॅडम मेनका मूव्हमेंट’ ही अभिवन संकल्पना शुक्रवारपासून (२५ मे) दोन दिवसांच्या नृत्याविष्कारातून उलगडणार आहे. टळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा महोत्सव होणार आहे. 
नृत्याविष्काराची ही चळवळ भारतीय आद्य नृत्यरचनाकार मॅडम मेनका यांना समर्पित करण्यात आली आहे. ‘नृत्यालयम’ द्वारे मॅडम मेनका यांनी १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक संरचनांची निर्मिती केली. या नृत्य संरचना भारतात आणि भारताबाहेर रसिकमान्य झाल्या. यांचेच प्रतिबिंब या नृत्यमहोत्सवात पाहायला मिळणार आहे. यामध्ये अमीरा पाटणकर (ए क्लोक डज नॉट मेक ए मॉन्क), मानसी देशपांडे (अहंकाराचा नाश तिथे सुखाचा सहवास), केतकी शहा (द हँड दॅट रॉक्स द क्रेडल शॅल रूल द वर्ल्ड), लीना केतकर (मौनम सर्वार्थ साधनम्),  निखिल परमार आणि मेघना राव (अनटिल द लायन्स लर्न टू राइट, हिस्टरी शॅल ग्लोरिफाय द हंटर) असे सहा कलाकार प्रत्येकी २५ मिनिटांच्या पाच नृत्यसंरचनांचे सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती नादरूप संस्थेच्या प्रमुख आणि ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे यांनी दिली. 
नृत्य संरचनांच्या सादरीकरणानंतर त्यावर गटचर्चा होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक आणि कला इतिहासकार आशिष मोहन खोकर या गटचर्चेचे प्रमुख असून शुभांगी दामले, प्रमोद काळे, किरण यज्ञोपवीत, परिमल फडके, हृषीकेश पवार, प्रणती प्रताप, जयश्री बोकील, हर्षवर्धन पाठक, नरेंद्र भिडे आणि रेखा नाडगौडा असे विविध क्षेत्रातील मान्यवर त्यामध्ये सहभागी होणार आहेत. या उपक्रमामुळे संरचनात्मक तत्त्व, शाश्वत सौंदर्यमूल्ये व नवनवीन विचारधारा यांच्यावर सखोल चर्चा घडावी, अशी अपेक्षा असल्याचे शमा भाटे यांनी सांगितले. दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून दुसऱ्या ºया दिवशी शेवटच्या सत्रात खुले चर्चासत्र होणार आहे. 

Web Title: Dance innovation will be reveal into phrases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.