क्रिकेट सट्टा; दौैंडमध्ये दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 03:40 AM2017-11-27T03:40:29+5:302017-11-27T03:40:40+5:30

बांगलादेश प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील एका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाºया दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, सट्टा लावणारे चार जण फरार झाले आहेत.

 Cricket betting; Two people arrested in Daund | क्रिकेट सट्टा; दौैंडमध्ये दोन जणांना अटक

क्रिकेट सट्टा; दौैंडमध्ये दोन जणांना अटक

Next

दौंड : बांगलादेश प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील एका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाºया दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, सट्टा लावणारे चार जण फरार झाले आहेत. दोन आरोपींकडून ४० हजार ६१५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दौैंड शहरात करण्यात आली.
दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी आज याबाबत माहिती दिली. सट्टा घेणारे रितेश केशवदास काकरा (वय २६, रा. संस्कृती अपार्टमेंट, जनता कॉलनी, दौंड) व शदीद रफिक शेख (वय ३०, रा. छत्रपती शिवाजी चौक, दौंड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दौंड पोलिसांना २५ नोव्हेंबर रोजी शहरातील गोकुळ हॉटेलच्या मागे सुरभी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बांग्लादेश प्रीमियर लीग अंतर्गत एका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे छापा टाकला. शदीद शेख, रितेश काकरा व रफिक शेख हे तिघे सट्टा घेत होते. पोलीस आल्याचे पाहून रफिक शेख हा पळाला तर रितेश काकरा व शदीद शेख यांना पकडण्यात आले. दोघांकडून नऊ मोबाईल संचांसह एकूण ४० हजार ६१५ रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीसांनी क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी रफीक शेख (रा. गांधी चौक, दौंड), जितेंद्र दुलानी (रा.जनता कॉलनी, दौंड), रियाज बागवान (रा. गांधी चौक, दौंड), नरेश (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून ते फरार आहेत.
दौंड पोलीस ठाण्याचे नाईक अण्णासाहेब देशमुख यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. सहायक फौजदार दिलीप भाकरे, पोलीस हवालदार कल्याण शिंगाडे, एस. के. बोराडे, अण्णासाहेब देशमुख, एन. बी. वलेकर, आदींनी सहभाग घेतला.

Web Title:  Cricket betting; Two people arrested in Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.