विद्यापीठात होणार ‘अवकाश विज्ञाना’वर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 07:17 PM2018-12-06T19:17:58+5:302018-12-06T19:24:51+5:30

देशभरातील अवकाश विज्ञानातील नामवंत संस्था व संशोधकांचा समावेश असलेली ‘नॅशनल स्पेस सायन्सेस सिम्पोझियम’ ही राष्ट्रीय परिषद जानेवारी महिन्यात पुण्यात होणार आहे.

coversation on science in University | विद्यापीठात होणार ‘अवकाश विज्ञाना’वर मंथन

विद्यापीठात होणार ‘अवकाश विज्ञाना’वर मंथन

googlenewsNext
ठळक मुद्देयापूर्वी डिसेंबर १९८३ मध्ये विद्यापीठात या परिषदेचे आयोजनदेशभरातील सर्व महत्त्वाच्या संस्थांचे तसेच, विद्यापीठांचे सुमारे ५०० ते ६०० प्रतिनिधी सहभाग

पुणे : देशभरातील अवकाश विज्ञानातील नामवंत संस्था व संशोधकांचा समावेश असलेली ‘नॅशनल स्पेस सायन्सेस सिम्पोझियम’ ही राष्ट्रीय परिषद जानेवारी महिन्यात पुण्यात होणार आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाला परिषदेचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, नव संशोधक, अवकाश प्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. 
विद्यापीठामध्ये दि. २९ ते ३१ जानेवारी यादरम्यान ही परिषद होणार आहे. यापूर्वी डिसेंबर १९८३ मध्ये विद्यापीठात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद दर दोन-तीन वर्षांनी भरवण्यात येते. त्यात अवकाश विज्ञानाशी संबंधित सर्व मुद्द्यांबाबत चर्चा होते. देशभरातील सर्व महत्त्वाच्या संस्थांचे तसेच, विद्यापीठांचे सुमारे ५०० ते ६०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यापूर्वीची परिषद केरळमधील थिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस रीसर्च सेंटरमध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये पार पडली होती, अशी माहिती विद्यापीठातील वातावरण व अककाश विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. पी. प्रदीप कुमार यांनी दिली.
परिषदेतील एकूण सहभागी संशोधकांपैकी एक तृतियांश संशोधक ‘इस्रो’मधील असतात. त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी इतर संस्थांमधील संशोधकांना उपलब्ध होते. अवकाश विज्ञानातील भविष्यातील दिशा आणि उपक्रमांबाबत माहिती करून घेण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरते. ही परिषद भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) प्रायोजित करण्यात येते. पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स (आयुका) आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अस्ट्रोफिजिक्स (एनसीआर.ए) या संस्था परिषदेचे सहआयोजक असतील. या संस्थांसह परिषदेमध्ये फिजिकल रीसर्च लॅबोरेटरी (अहमदाबाद), नॅशनल अटमॉस्फेरिक रीसर्च लॅबोरेटरी (आंध्र प्रदेश), स्पेस अप्लिकेशन सेंटर (अहमदाबाद), इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जीओमॅग्नेटिझम (पनवेल), इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अस्ट्रोफिजिक्स (बंगळुरू), इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी (पुणे), स्पेस फिजिकल लॅबोरेटरी (थिरूअनंतपूरम) या संस्थांमधील संशोधक सहभागी होणार आहेत. 

Web Title: coversation on science in University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.