कौटुंबिक हिंसाचार, पोटगीसाठी अर्ज दाखल करणार्‍या पत्नीला न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:52 AM2017-11-04T11:52:37+5:302017-11-04T11:57:59+5:30

कौटुंबिक हिंसाचार आणि पोटगीसाठी अर्ज दाखल करणार्‍या पत्नीला न्यायालयाने धक्का दिला आहे. पतीने दाखल केलेला घटस्फोट अर्ज कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश लक्ष्मण मगदूम यांनी मंजूर केला.

Court bribery to wife for filing nomination papers for family violence | कौटुंबिक हिंसाचार, पोटगीसाठी अर्ज दाखल करणार्‍या पत्नीला न्यायालयाचा दणका

कौटुंबिक हिंसाचार, पोटगीसाठी अर्ज दाखल करणार्‍या पत्नीला न्यायालयाचा दणका

Next
ठळक मुद्देसासरची मंडळी त्रास देत असल्याच्या कारणावरून पत्नीची पोटगीची मागणीपतीने पत्नीपासून घटस्फोट मिळावा म्हणून न्यायालयात दाखल केला होता दावा

पुणे : एकाच घरात राहत असताना कौटुंबिक हिंसाचार आणि पोटगीसाठी अर्ज दाखल करणार्‍या पत्नीला न्यायालयाने धक्का दिला आहे. पतीने दाखल केलेला घटस्फोट अर्ज कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश लक्ष्मण मगदूम यांनी मंजूर केला. 
घटस्फोटाच्या खटल्यांमध्ये पती आणि पत्नी एकमेकांपासून बराच काळ वेगळे राहत असतील अथवा घटस्फोट दाखल झाल्यावर कायद्याने दिलेल्या काळापुरते वेगळे राहिले, तर घटस्फोट मंजूर केला जातो. कौटुंबिक न्यायालयात दाखल असलेल्या या दाव्यात पती आणि पत्नी एकाच सदनिकेत राहत होते. टू बीएचके फ्लॅट असलेल्या घरात एका बेडरूममध्ये पत्नी आणि दुसर्‍या बेडरूममध्ये तिचा पती आणि सासू सासरे राहत होते. या सदनिकेतील स्वयंपाकघर आणि हॉलचा वापरही ती करीत होती. 
एकाच घरात राहत असताना सासरच्या लोकांकडून आपल्याला त्रास देण्यात येत असून, त्यांनी आपल्याला त्रास देऊ नये, असा दावा तिने न्यायालयात दाखल केला होता. तसेच पतीकडून पोटगी मिळावी, अशी मागणीही केली होती. तर, तिच्या पतीने पत्नीपासून घटस्फोट मिळावा म्हणून न्यायालयात दावा दाखल केला होता. अर्जदार पतीतर्फे अ‍ॅड. भारत मोरे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Court bribery to wife for filing nomination papers for family violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.