पु्ण्याचा श्वास असलेल्या तळजाई टेकडीवरून नगरसेवक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 07:00 AM2019-06-19T07:00:00+5:302019-06-19T07:00:07+5:30

तळजाई टेकडी वाचविण्यासाठी प्रयत्न करणा-या नगरसेवकावर प्रशासन गुन्हा दाखल करते ही अत्यंत खेदाची बाब आहे.

Corporator aggressive for Taljai hill | पु्ण्याचा श्वास असलेल्या तळजाई टेकडीवरून नगरसेवक आक्रमक

पु्ण्याचा श्वास असलेल्या तळजाई टेकडीवरून नगरसेवक आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देसदस्यांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची माहिती देण्याचे महापौरांचे आदेश                 तळजाई टेकडीवर सिमंटचे जंगल उभे करण्याचा घाट  तळजाई टेकडी येथे १०८ एकरमध्ये  वनउद्यान उभारणी

पुणे : पु्ण्याचा श्वास असलेली व पुणेकरना शुध्द हवा मिळण्याचे एकमेव ठिकाणी तळजाई टेकडीवर सिमंटचे जंगल उभे करण्याचा घाट घातला जात आहे. या चुकीच्या पध्दतीने सुरू प्रकल्पाला विरोध करणा-या, तळजाई टेकडी वाचविण्यासाठी प्रयत्न करणा-या नगरसेवकावर प्रशासन गुन्हा दाखल करते ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे सांगत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच तळजाई टेकडी नष्ट करण्याचे काम तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली. याबाबत संबंधित प्रभागाती सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची सर्व माहिती देण्याच्या आदेश महापौर मुक्त टिळक यांनी सभेत दिले.                                                           
    तळजाई टेकडी येथे १०८ एकरमध्ये  वनउद्यान उभारण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने एक विकास आराखडाही तयार केला आहे. सध्या महापालिका प्रशासनाकडून याठिकाणी वाहनतळ उभारण्यात येत आहे. वाहनतळ उभारत असताना झाडांची कत्तल करण्यात येत असून सिमेंटचे जंगल उभे केले जात असल्याने याकामाला स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी विरोध केला होता. प्रशासनाच्या कामात अडथळा आणल्यामुळे जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत मंगळवार (दि.१८)  झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत महापालिका प्रशासनाने तळजाई टेकडी व टेकडीवरील वनराई नष्ट करण्याचा घाट घातला आहे. शहराचे प्रदुषण कमी करण्यासाठी एकीकडे वृक्षरोपण करण्याची नौटंकी केली जाते, परंतु दुसरीकडे नागरिकांनी थेंबथेंब पाणी घालून वर्षनो वर्ष जगवलेली व वाढवलेली झाडे पार्किंग व अन्य प्रकल्पासाठी तोडण्याचा घाट घातला असल्याचे नगरसेवक अश्विनी कदम यांनी सभागृहात स्पष्ट केले.   
    यावर विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी आपल्या मतदार संघात चुकीचे काम सुरु असल्याचे ते थांबविण्याचा प्रयत्न करणा-या सदस्यांवर गुन्हा देखाल केला म्हणून   प्रशासनाची चांगलीच कान उघडनी केली. ज्या सभासदाने नगरसेवक म्हणून 25 वर्षे महापालिकेची सेवा केली, तळजाई टेकडीवरील वन संपदा टिववण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे चुकीचे आहे.त्यामुळे प्रशासनाने याचा खुलासा करण्याची मागणी बराटे यांनी केली.
    याबाबत स्पष्टीकरण करताना आयुक्त सौरभ राव यांनी सदस्यांनी कामांची पाहणी करणे काहीच गैर नाही. तळजाई टेकडीचा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला असून, तो मंजूर आहे. त्यानुसारच येथे काम करण्यात येत आहे. परंतु येथे सुरु असलेल्या पार्किंग शेडच्या कामामध्ये जगताप यांच्याकडून वारंवार अडथळा आणला जात होता.याठिकाणी मारहाणीचा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान महापौर मुक्ता टिळक यांनी तळजाई टेकडी येथे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती संबंधित सर्व  सदस्यांना देण्याचे आदेश मुख्य सभेत प्रशासनाला दिले.
----------
नगरसेवकांचे वैयक्तीक आरोप-प्रत्यारोप
 निवडणुकीमध्ये सुभाष जगताप आणि आबा बागुल हाता-हात घालून मतदान मागायला फिरत होते, मग आता घोडे कुठे अडले सांगत, तळजाई टेकडीवरील वाद हा आघाडीमधील बिघडी आहे, अशी टीका नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी सभागृहात केली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिळीमकर याना आजोबांचा सल्ला देऊ नका असे प्रतिउत्तर दिले. यावर शिळीमकर थांबले नाहीत त्यांनी टीका सुरूच ठेवली त्यामुळे काही नगरसेवकांनी शिळीमकर यांच्यावर वैयक्तीक टीका केली.

Web Title: Corporator aggressive for Taljai hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.