चौकशी आयोगाकडे जमा होणाऱ्या कागदपत्रांची प्रत मिळावी : कोरेगाव भीमा दंगलप्रकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 08:48 PM2018-10-04T20:48:00+5:302018-10-04T20:51:18+5:30

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडे जमा होणारी कागदपत्रांची पत्र खटल्याचा कामकाजासाठी मिळावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे.

A copy of the documents submitted to the inquiry commission should be given: Koregaon Bhima case | चौकशी आयोगाकडे जमा होणाऱ्या कागदपत्रांची प्रत मिळावी : कोरेगाव भीमा दंगलप्रकरण 

चौकशी आयोगाकडे जमा होणाऱ्या कागदपत्रांची प्रत मिळावी : कोरेगाव भीमा दंगलप्रकरण 

googlenewsNext
ठळक मुद्देकामकाजास मुदतवाढ देण्याची शक्यतायेत्या ६ आॅक्टोबरपर्यंत १७ व्यक्तींची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया केली जाणार

पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडे जमा होणारी कागदपत्रांची पत्र खटल्याचा कामकाजासाठी मिळावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे. 
आयोगाच्या कामकाजाला बुधवारी सुरुवात झाली आहे. आयोगाकडून येत्या ६ आॅक्टोबरपर्यंत १७ व्यक्तींची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र, त्यास जास्त अवधी लागत असल्याने या कामकाजास मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत जमा होणारी कागदपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी हर्षाली विनायक पोतदार यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी अ‍ॅड. रोहन नहार यांच्यामार्फत आयोगाकडे मागणी अर्ज केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रमामपत्रे, याप्रकरणात दाखल झालेल्या प्रकरणांची सध्यस्थिती काय आहे याचे कागदपत्रे, दोषारोपपत्र, एफआयआर, पंचनाम्याची कॉपी, फोटो आणि व्हिडीओची सॉफ्ट कॉपी, शुक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली केस डायरी, वायरलेसद्वारे मिळालेले मॅसेज, २८ डिसेंबर २०१७ ते ३ जानेवारी २०१८ दरम्यान शिक्रापूर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या चौकींमध्ये खबरदारीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी, याकाळात एसआयटीने दिलेला रिपोर्टची प्रत द्यावी, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.  
कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या द्विसदस्यीय आयोग कोरेगाव भिमा प्रकरणी चौकशी करीत आहे.  

Web Title: A copy of the documents submitted to the inquiry commission should be given: Koregaon Bhima case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.